६६ वर्षानंतर कापली नखं

बोटाचे नख जरासे वाढले की, लगेच आपण ती नखे कापतो किंवा नखांना आकार देतो. पण देशात एक गृहस्थ असे आहेत ज्यांनी गेली ६६ वर्षे नखं कापलीच नव्हती. श्रीधर चिल्लाल असे त्यांचे नाव असून इतकी वर्षे नखं त्यांनी डाव्या हाताच्या बोटांची नखं कापली नाहीत, इतक्या वर्षात ही नखं किती वाढली असतील, याचा अंदाज तुम्हाला आला असेलच. पण आता ही नखं कापण्यात आली आहेत. विशेष म्हणजे याचा व्हिडिओ देखील गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने युट्युबवर शेअर केला आहे.

shridhar chillal
श्रीधर चिल्लाल यांनी वाढवलेली नखे

नखं कापताना झाले भावूक

चिल्लाल यांचे नखांवर प्रेम होते. बुधवारी नखं कापताना ते भावूक झालेले स्पष्टपणे दिसत आहेत. शिवाय ही नखं कापताना होणारा त्रासही त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत आहे. पुण्याचे श्रीधर चिल्लाल यांनी १९५२ सालापासून त्यांनी नखं कापलेली नाहीत. मात्र वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी आपले नखं कापण्याचा निर्णय घेतला आहे.

गिनीज वर्ल्डमध्ये नोंद

चिल्लाल यांच्या अंगठ्याच्या नखाची लांबी १९७.८ सेंटीमीटर आहे तर, एका हाताच्या सगळ्या नखांची लांबी ९०९.६ सेंटीमीटर ऐवढी आहे.नखांमुळे २०१६ मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांच्या नावाची नोंद झाली आहे.


 वाचा- ६६ वर्षानंतर श्रीधर चिल्लाल कापणार नखं

म्युझिअमध्ये ठेवणार नखं

चिल्लाल यांची नखं कापण्याचा कार्यक्रम अमेरिकेतील टाईम्स स्क्वेअर येथे पार पडला  या कार्यक्रमानंतर श्रीधर यांची नखं म्युझियममध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत.

First Published on: July 12, 2018 7:50 PM
Exit mobile version