ब्रिटननंतर आता दक्षिण आफ्रिकेत आढळला कोरोनाचा नवा विषाणू

ब्रिटननंतर आता दक्षिण आफ्रिकेत आढळला कोरोनाचा नवा विषाणू

एका वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाविरुद्धची लढाई लढतोय. दरम्यान, कोरोना लसीच्या बातमीने जगाला नवीन आशा दिली. पण ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळल्याने पुन्हा एकदा लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, ब्रिटनपाठोपाठ आता दक्षिण आफ्रिकेत देखील कोरोनाचा नवा विषाणू सापडल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनाचा हा नवा विषाणू ब्रिटनमध्ये आढळलेल्या विषाणूपेक्षा वेगळा आहे. नव्या विषाणूमुळे दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यूंचा आकडा वेगाने वाढला आहे.

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा विषाणू आढळल्याने खळबळ उडाली आहे. रूग्ण आणि मृत्यूच्या संख्येत वेगाने वाढ झाली आहे. आश्चर्य म्हणजे दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा प्रकार आढळला आहे तो ब्रिटनमध्ये सापडलेल्या नवीन विषाणूपेक्षा वेगळा आहे. दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञ कोरोनाची लस या नवीन विषाणूवर परिणामकारक आहे की नाही याचा अभ्यास करीत आहेत. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी विकसित केलेल्या लसींसह इतर काही लसींची दक्षिण आफ्रिकेत क्लिनिकल ट्रायल सुरु आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य अधिकारी आणि विषाणूच्या रणनीतीचे नेतृत्व करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या मते, 501.V2 म्हणून ओळखल्या जाणार्‍या या नवीन विषाणूमुळे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. सरकारच्या मंत्री सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रोफेसर सलीम अब्दुल करीम म्हणाले की, यावर भाष्य करणे घाईचे होईल. परंतु प्राथमिक आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की विषाणू अधिक वेगाने पसरत आहे. अजून रुग्ण वाढू शकतात असे देखील करीम यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेत सध्या आठ हजार पाचशे कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. ऑगस्टमध्ये दाखल झालेल्या अशा रुग्णांची संख्या ८,३०० इतकी नोंदली गेली. देशात एकूण ९ लाख १२ हजार ४७७ प्रकरणे नोंदली गेली आहेत. ज्यात संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा २४ हजार ५३९ इतका आहे.

 

First Published on: December 22, 2020 8:43 AM
Exit mobile version