इस्त्रो ‘चंद्रयान ३’ मोहिमेच्या तयारीत!

इस्त्रो ‘चंद्रयान ३’ मोहिमेच्या तयारीत!

प्रातिनिधिक फोटो

लवकरच इस्त्रो चंद्रयान ३ चंद्रावर पाटवण्याच्या तयारीत आहे. या मोहिमेसाठी इस्त्रोकडून वेगाने काम सुरू आहे. नोव्हेंबर २०२० पर्यंत साधारण ही मोहिम सुरू होऊ शकते. या आधी इस्त्रोकडून सप्टेंबरमध्ये चंद्रयान २ च्या लँडरला चंद्रावर पाठवण्यात आले. मात्र त्या मोहिमेला यश आले नाही. मात्र इस्त्रोने पाठवलेले ऑर्बिटर आजही सुस्थितीत काम करत आहे. ७ वर्षापर्यंत हे ऑर्बिटर काम करेल असे इस्त्रोच्या तज्ज्ञांनी म्हटले आहे.

चंद्रयान ३ साठी इस्त्रोने अनेक समित्या स्थापन केल्या आहेत. तसेच पॅनल सोबत तीन उपसमित्यांच्या ऑक्टोबरपासून आतापर्यंत तीन उच्चस्तरीय बैठका घेतल्या आहेत. या मिशनमध्ये फक्त लँडर आणि रोवरच असणार आहे. म्हणजेच यामध्ये ऑर्बिटर पाठवला जाणार नाही. कारण चंद्रयान २ चा ऑर्बिटर आजही चांगली काम करत आहे.

एका वैज्ञानिकाच्या माहितीनुसार चंद्रयान ३ चे काम प्रगतीपथावर सुरू आहे. याविषयी ५ ऑक्टोबरला एक नोटीसही जारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये म्हटले होते की, चंद्रयान २ च्या तज्ज्ञ समितीद्वारे केलेल्या शिफारशीनुसार लँडरमध्ये बदल करावेत.

First Published on: November 14, 2019 1:46 PM
Exit mobile version