cabinet reshuffle : नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक, पुढील रणनीतीवर होणार चर्चा

cabinet reshuffle : नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक, पुढील रणनीतीवर होणार चर्चा

cabinet reshuffle : नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक, पुढील रणनीतीवर होणार चर्चा

पंतप्रधान मोदींच्या केंद्रीय मंत्रीमंडळात काल (बुधवारी) पहिल्यांदाच मोठे बदल करण्यात आले. केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारामध्ये एकुण ४३ नव्या चेहऱ्यांना पसंती देण्यात आली. या मंत्रीमंडळ विस्तारानंतर आज सर्व नवनिर्वाचित मंत्री पदभार स्वीकारणार आहे. मोदींच्या अध्यक्षतेखाली नव्या मंत्रीमंडळाची पहिलीच बैठक आज होणार असून यामध्ये पदभार स्वीकारण्याबरोबरचं पुढील रनणीतीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारात मंत्र्यांनी राष्ट्रपती भवनामध्ये बुधवारी ४३ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. यामध्ये १५ कॅबिनेट तर २८ राज्यमंत्रीपदासाठी शपथ घेण्यात आली. मंत्रीपदाची सर्वात प्रथम नारायण राणे यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली गेली. त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. तर कपिल पाटील डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मोंदीच्या नव्या मंत्रीमंडळात एकुण ४३ तरूण मंत्र्यांना संधी दिली आहे. त्यामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्री अशा दोन पद्धतीची शपथ देण्यात आली. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील शपथ घेणारे चारही मंत्री वेगळ्या पक्षातून भाजपामध्ये आले आहेत. मोदींचे मंत्रीमंडळ आता एकूण ७८ जणांचे झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काउंसिल ऑफ मिनिस्टर्स (मंत्रीपरिषद) आणि मंत्रीमंडळ बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत मोदी काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. तर आगीम रणनीतिवर नव्या मंत्र्यांसह चर्चा करण्याची शक्यता आहे. आज सायंकाळी ५ ते ७ दरम्यान ही बैठक पार पडणार आहे. प्रथम मंत्रिमंडळाची बैठक पार पडेल आणि त्यानंतर सात वाजता मंत्रीपरिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीत कॅबिनेट, स्वतंत्र प्रभार आणि राज्यमंत्री सहभार घेणार आहेत.


मुंबई महापालिकेच्या शिपायांच्या नातेवाईकांना कंत्राटकामे; चौकशी व कारवाईची मागणी


 

First Published on: July 8, 2021 9:34 AM
Exit mobile version