रामानंतर आता गौतम बुद्धांवरही नेपाळचा दावा

रामानंतर आता गौतम बुद्धांवरही नेपाळचा दावा

योगाचा उगम नेपाळमध्ये झाला,भारत अस्तित्वातही नव्हता, पंतप्रधान ओलींचा नवा दावा

चीनच्या इशाऱ्यावरुन सीमावर्ती भागात तणाव निर्माण करणाऱ्या नेपाळने आता भारतीय देवी-देवतांविषयी तसंच महापुरुषांविषयी वाद निर्माण करण्यास सुरवात केली आहे. भारतीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी भगवान गौतम बुद्ध भारतीय असल्याचं म्हटलं होतं. यावर नेपाळने आक्षेप घेत गौतम बुद्ध नेपाळी असल्याचं म्हटलं आहे. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी येथे झाला हे ऐतिहासिक आणि पौराणिक तथ्यांवरून सिद्ध झालं आहे. तथापि, भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही नेपाळला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने नेपाळच्या आक्षेपाला विरोध दर्शविताना म्हटलं आहे की, सीआयआयच्या कार्यक्रमात शनिवारी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या वक्तव्याने आमच्या सामायिक बौद्ध वारशाचा संदर्भ दिला. नेपाळमध्ये लुंबिनी येथे गौतम बुद्धांचा जन्म झाला यात काही शंका नाही. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर म्हणाले की, महात्मा गांधी आणि भगवान बुद्ध असे दोन भारतीय महान आहेत ज्यांना जगात महत्त्वाचं मानलं जातं.


हेही वाचा – पुण्यात मावशी आणि तिच्या प्रियकराने केला १६ वर्षांच्या भाचीचा विनयभंग


नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं की गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी येथे झाला हे ऐतिहासिक आणि पौराणिक तथ्यांवरून सिद्ध झालं आहे. लुंबिनी हे बुद्धांचे जन्मस्थान आहे, ज्यास युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलें आहे. इतकंच नव्हे तर नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या परराष्ट्र विभागाचे प्रमुख माधव कुमार नेपाळ यांनी जयशंकर यांच्या विधानावर आक्षेप घेतला. नेपाळ कॉंग्रेसचे प्रवक्ते बिश्वास प्रकाश शर्मा यांनीही जयशंकर यांच्या दाव्याला विरोध केला.

ओलींचा पुन्हा अयोध्याबाबत दावा

दरम्यान, नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पुन्हा एकदा अयोध्याचा जयघोष केला आहे. नेपाळच्या चितवनच्या माडी भागातील अयोध्यापुरी येथे खरी अयोध्या असल्याचा असा दावा करत ते म्हणाले की तेथे रामाची मूर्ती बसवून त्या भागाचा विकास करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला जाईल. पंतप्रधान ओली यांनी तेथेही उत्खनन कामे करण्याचे निर्देश दिले आहेत. ओली म्हणाले की, सर्व पुरावे सिद्ध करतात की भगवान रामांचा जन्म नेपाळच्या अयोध्यापुरी येथे झाला होता.

 

First Published on: August 10, 2020 10:19 AM
Exit mobile version