घरमहाराष्ट्रपुण्यात मावशी आणि तिच्या प्रियकराने केला १६ वर्षांच्या भाचीचा विनयभंग

पुण्यात मावशी आणि तिच्या प्रियकराने केला १६ वर्षांच्या भाचीचा विनयभंग

Subscribe

दोन्ही आरोपींना अटक

पुण्यात मावशी आणि तिच्या प्रियकराने १६ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लॉकडाउन काळात मावशी व तिचा प्रियकर तिच्या अल्पवयीन भाचीला तिच्या इच्छेविरोधात अश्लील चित्रफीत दाखवून शोषण करत होती. याप्रकरणी मावशीला व तिच्या प्रियकराला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. एप्रिल महिन्यात हा प्रकार घडल्याचं समोर येत आहे. धीर एकवटत पीडित मुलीने आपल्या आईला याबद्दल माहिती दिली. त्यानंतर आईने कोंढवा पोलीस ठाण्यात आपली बहिण आणि तिच्या प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली. पुणे पोलिसांनीही या प्रकरणात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन मावशी व तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

एप्रिल महिन्यात लॉकडाऊन काळात पीडित मुलीची आई आपल्या ४ मुलांना बहिणीकडे सोडायची. या काळात मावशीचा प्रियकर तिला भेटण्यासाठी घरी यायचा. मुलीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार मावशी व तिचा प्रियकर इच्छेविरोधात मुलीला अश्लील चित्रफीत दाखवत होते. मुलीने इतके महिने याप्रकरणी कोणालाच माहिती दिली नव्हती. परंतू अखेरीस धीर एकवटत तिने आपल्या आईला घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिल्याचं कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितलं.

- Advertisement -

दरम्यान, दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची कोरोना चाचणी केली आहे. दोन्ही आरोपींचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तथापी, गंभीर गुन्हा असल्यामुळे न्यायालयानेही आरोपींना कोठडीत टाकण्याची परवानगी दिली आहे. परंतू कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे जेल प्रशासन आरोपींना दाखल करुन घेत नाही आहे. दरम्यान, दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. सध्या या आरोपींवर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचार झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.


हेही वाचा – लॉकडाऊनविरोधात वंचित आघाडी आक्रमक; १२ ऑगस्टला ‘डफली बजाव’ आंदोलन

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -