हायड्रॉक्सीक्लोरोक्विन घेतल्यानंतर १० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांची तब्येत बिघडली

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन घेतल्यानंतर १० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांची तब्येत बिघडली

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या गंभीर प्रकरणांमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध प्रभावी ठरत आहे, परंतु या औषधाचे दुष्परिणाम देखील आहेत. याबाबतचं संशोधन दिल्लीतील एम्स रुग्णालयात चालू आहे. काही रुग्णालयांमधील आरोग्य कर्मचार्‍यांनी औषध घेतल्यानंतर त्याच्या दुष्परिणामांची माहिती दिली आहे. या कर्मचार्‍यांचे सरासरी वय ३५ वर्षे आहे. तसंच यापैकी २२ टक्के आरोग्य कर्मचारी मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयविकाराने ग्रस्त आहेत. जेव्हा त्यांनी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध घेतलं तेव्हा १० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पोटात दुखायला लागलं. तर ६ टक्के लोकांना उलट्या झाल्या. यापैकी १४ टक्के आरोग्य कर्मचार्‍यांनी ईसीजी केला नसल्याची माहिती मिळाली आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचे हृदयावर दुष्परिणाम होत आहेत. शनिवारी इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) प्रमुख एपिडिमिक स्पेशलीस्ट डॉ. रमन आर. गंगाखेडकर म्हणाले की, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाचा अभ्यास केला जाणार आहे परंतु लॉकडाऊनमुळे सध्या ते शक्य झालं नाही.

या संशोधनात आठ आठवड्यांमध्ये ४८० रुग्णांचा समावेश करण्यात येणार होता. तथापि आयसीएमआरने आपल्या पर्यायामध्ये आणखी एक अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील एम्समध्ये सध्या दोन प्रकारे संशोधन सुरु आहे. ते म्हणाले की बहुतेक आरोग्य कर्मचार्‍यांनी औषध घेतल्यानंतर पोटात दुखायला लागलं.


हेही वाचा – हायड्रॉक्सीक्लोरोक्विन म्हणजे काय आणि जगभरात मोठ्या प्रमाणात मागणी का आहे?


आत्तापर्यंत हे कळलं आहे की २२ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी आधीच असलेल्या रोगांच्या भीतीमुळे हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध घेतलं असेल. डॉ. गंगाखेडकर म्हणतात की, भीतीमुळे आरोग्य कर्मचारी औषध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांना याची गरज नाही आहे. काही आरोग्य कर्मचारी जे थेट कोविड-१९ शी लढा देत नाही आहेत ते पण हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध घेत आहेत.

 

First Published on: April 19, 2020 2:50 PM
Exit mobile version