मतदानानंतर मोदींचा रोड शो; निवडणूक आयोगाने मागवला अहवाल

मतदानानंतर मोदींचा रोड शो; निवडणूक आयोगाने मागवला अहवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणूकीसाठी मंगळवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान केले. मात्र मतदान करण्यासाठी जाण्यापूर्वी पंतप्रधानांनी अहमदाबादमध्ये रोड शो काढला होता. याप्रकरणी काँग्रेसने आक्षेप घेत मोदींनी रोड शो काढून आचारसंहितेचे उल्लंघन केले असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. याप्रकरणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरातमधील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे.

गुजरातच्या अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मतदान केले. निवडणूक आयोगाने सांगितले की, अहमदाबादमध्ये मोदींनी काढलेल्या रोड शोची चौकशी केली जाणार आहे. मतदान केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीपमधून रोड शो केला. तसंच त्यांनी त्यावेळी भाषण देखील केले. त्यानंत विरोधी पक्षाने याप्रकरणी मंगळवारी संध्याकाळी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने गुजरातच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडून याचा अहवाल मागवला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले की, प्रथमदर्शनी पंतप्रधानांनी आदर्श निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन केले नाही. मात्र, या बाबत आयोगाने कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही.

First Published on: April 24, 2019 10:00 AM
Exit mobile version