Hijab Row : हिजाब विरोधात ताजमहलमध्ये ‘हनुमान चालीसा’ पठन ! विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते ताब्यात

Hijab Row : हिजाब विरोधात ताजमहलमध्ये ‘हनुमान चालीसा’ पठन ! विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते ताब्यात

agra VHP activists arrested for reciting 'Hanuman Chalisa' in Taj Mahal against hijab Row

Hijab Row : कर्नाटकमध्ये सुरू झालेल्या हिजाब प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत. अनेक राज्यात प्रकरण निवळताना दिसत असताना दुसरीकडे नवीन प्रकरणे समोर येत आहे. हिजाब  प्रकरणात आता विश्व हिंदू परिषदेचे उडी घेतली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या ( विहिप ) (Vishwa Hindu Parishad ) कार्यकर्त्यांना हिजाब विरोधात थेट आग्रातील ताजमहालमध्ये हनुमान चालिसेचे पठण करण्याचा प्रयत्न केला. VHP च्या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  VHPच्या ब्रज क्षेत्राचे उपाध्यक्ष, आशिष आर्य यांच्या नेतृत्वात हनुमान चालीसेचे पठण करण्याची योजना आखण्यात आली होती. हिजाब विरोधात VHPच्या कार्यकर्त्यांनी ताजमहलमध्ये प्रवेश करुन केशरी रंगाचा स्क्रॉफ घालून हनुमान चालीसाचे पठण करण्याची योजना होती असे त्यांनी सांगितले आहे.

आशिष आर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक शैक्षणिक संस्थेला आपला ड्रेस कोड असतो. मात्र काही असामाजिक तत्व हिजाबसाठी विरोधी प्रदर्शने करुन वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात. काही लोक हिजाबचा संदर्भ जाणूनबुजून धार्मिक भावनांशी लावून जातीय वाद भडकवण्याची कामे करत आहे. आगामी विधानसभा निवडणूकीच्या मदतानासाठी केलेला हा प्रयत्न आहे. इथे कोणताही व्यक्तिगत कायदा लागू केला जाऊ शकत नाही. देश संविधानाचे पालन करेन जे यासगळ्यापेक्षा सर्वेश्रेष्ठ आहे.

हिजाब विरोधात ताजमहलमध्ये हनुमान चालीसेचे पठण करायला गेलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतले. त्यांना हरिपर्वत पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. तिथे त्यांनी हनुमान चालीसेचे पठण केले आणि त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. त्यांचे निवेदन लिहून घेण्यात आले. त्यांच्यासोबत असलेल्या सर्वांना जेवण देऊन त्यांना सोडण्यात आले.


हेही वाचा – UP: हळदीच्या कार्यक्रमात विहिरीचा स्लॅब कोसळला, १३ महिलांचा बुडून मृत्यू!

First Published on: February 17, 2022 11:37 AM
Exit mobile version