घरताज्या घडामोडीUP: हळदीच्या कार्यक्रमात विहिरीचा स्लॅब कोसळला, १३ महिलांचा बुडून मृत्यू!

UP: हळदीच्या कार्यक्रमात विहिरीचा स्लॅब कोसळला, १३ महिलांचा बुडून मृत्यू!

Subscribe

लग्न सोहळ्यात काळाचा घात!

उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये बुधवारी मध्यरात्री एका लग्न सोहळ्यात अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. हळदीचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेलेल्या महिलांना विहिरीच्या स्लॅबवर उभे राहणे जीवावर बेतले आहे. हळदीच्या कार्यक्रमादरम्यान विहिरीचा स्लॅब कोसळल्यामुळे १३ मुली आणि महिलांचा बुडून मृत्यू झाला आहे. संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे.

- Advertisement -

माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या नेबुआ नौरंगिया ठाणे परिसरातील नौरंगिया शाळा टोलामध्ये एका घरात लग्न होते. यादरम्यान गावातल्या महिला आणि मुली लग्न सोहळा असलेल्या घराजवळील एका विहिरीवर उभ्या होत्या. यादरम्यान हळदीचा कार्यक्रम सुरू होता. पण अचानक विहिरीवर असलेली लोखंडी जाळी तूटली आणि महिला, मुली विहिरीत पडल्या.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळताच त्वरित पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केली. आतापर्यंत १३ महिला आणि मुलींचा बुडून मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी पोलीस आणि गावकऱ्यांची गर्दी झाली आहे.

या दुर्दैवी घटनेनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुशीनगरमध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते ट्विट करून म्हणाले की, ‘उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये घटलेली घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. यामध्ये ज्यांना आपले प्राण गमावावे लागले त्यांच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त करतो. तसेच जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन मदत करत आहे.’

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृत्यू झालेल्यांबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ बचाव कार्य राबवण्याचे आणि जखमी त्वरित उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.

एकही रुग्णवाहिका वेळेत पोहोचली नाही

गावातील एका तरुणाने सांगितले की, घटनेनंतर वेळेत एकही रुग्णवाहिका पोहोचली नाही. आम्ही गावातल्या १५ महिलांना वाचवले आहे. परंतु यादरम्यान १० मोबाईलवरून रुग्णवाहिकांना फोन करून माहिती दिली, पण एकही रुग्णवाहिका वेळेत घटनास्थळी पोहोचली नाही. घटनेनंतर खासगी आणि पोलिसांच्या गाड्यांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात नेण्यात आले.


हेही वाचा – नाशिकरोडवरील दत्तमंदिर परिसरात भीषण अपघात


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -