एअर इंडियाच्या लिलावाला दुसऱ्यांदा मुदतवाढ

एअर इंडियाच्या लिलावाला दुसऱ्यांदा मुदतवाढ

एअर इंडिया

मागील काही वर्षांपासून सरकारी मालकीची असलेली एअर इंडिया ही विमानकंपनी केंद्र सरकारने लिलावासाठी काढली होती. मात्र आता केंद्र सरकारने एअर इंडियाच्या लिलावाला मुदतवाढ दिली आहे. ही कंपनी खरेदी करण्यासाठी कोणीही पुढे न आल्याने केंद्र सरकारने दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. ३० जूनपर्यंत ही मुदतवाढ दिली आहे. कोरोनाचा संकटात जगभरातली आर्थिक घडामोडी विस्कळीत झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

खरेदीदार पुढे येत नसल्यामुळे दोन वेळा एअर इंडियाच्या लिलावाला मुदतवाढ देण्यात आली आहे. २७ जानेवारीपासून दुसऱ्या मुदतवाढीची विक्री प्रक्रिया सुरू केली होती. त्याची शेवटची मुदत ३० एप्रिल पर्यंत होती. आता हिच मुदत २ महिन्यांनी वाढवण्यात आली असून ३० जूनपर्यंत करण्यात आली आहे.

एअर इंडियावर ६० हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे. मात्र कंपनी खरेदीदाला अटीनुसार फक्त २३,२८६.५ कोटी रुपयांच्या कर्जाची जबाबदारी घ्यावी लागेल. बाकी कर्ज सरकार उचलणार आहे. सरकारला ३७००० कोटींच्या कर्जाचा बोजा उचलणार आहे. एअर इंडिया खरेदी करण्यास सक्षम असेल, त्याला कंपनीचे व्यवस्थापन सोपविण्यात येईल, अस करारात म्हणण्यात आले आहे. या लिलावाच्या बोलीसंदर्भात कागदपत्रे केंद्र सरकारने जाहीर केली आहेत.


हेही वाचा – #RIPIrfan: ना ते घेऊ शकले आईचं शेवटचं दर्शन, ना पूर्ण करू शकले तिची शेवटची…


 

First Published on: April 29, 2020 2:11 PM
Exit mobile version