घरताज्या घडामोडी#RIPIrfan: ना ते घेऊ शकले आईचं शेवटचं दर्शन, ना पूर्ण करू शकले...

#RIPIrfan: ना ते घेऊ शकले आईचं शेवटचं दर्शन, ना पूर्ण करू शकले तिची शेवटची इच्छा!

Subscribe

बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचं ५३ व्या वर्षीय बुधवारी निधन झालं आहे. मंगळवारी त्यांची कोलन इन्फेक्शनमुळे प्रकृती अचानक बिघडल्यानं मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मागील अनेक वर्षांपासून इरफान खान यांची कॅन्सरशी झुंज सुरू होती. मात्र इरफान खान यांची ही झुंज अपयशी ठरली आहे. पण यादरम्यान त्यांच्या दिवंगत आईची शेवटी इच्छा अपूर्ण राहिली आहे.

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये जन्मलेल्या इरफान खान यांनी बॉलिवूडमध्ये अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहे. इरफान यांच्या आई निधनापूर्वी म्हणाल्या होत्या की, माझा मुलगा लवकरच पूर्णपणे बरा होईल आणि ही लढाई जिंकून तो परत येईल.

- Advertisement -

इरफान खान यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी सांगितलं होत की, त्यांच्या आईची शेवटची इच्छा होती की, त्यांचा मुलगा इरफान मृत्यू झुंज देणारी लढाई जिंकून तो घरी परतेल आणि तो पूर्णपणे बरा होईल. पण असं होऊ शकलं नाही. इरफान खान ना त्यांच्या आईचं शेवटचं दर्शन घेऊन शकले ना आईचं शेवटी इच्छा पूर्ण करू शकले.

इरफान खान यांची आई सईदा बेगम यांची शनिवारी प्राणज्योत मालवली. सईदा बेगम ८२ वर्षांच्या असून दीर्घ आजाराने त्यांचं निधन झालं होत. गेल्या कित्येक दिवसांपासून त्या आजारी होत्या. दरम्यान इरफान खान आईच्या अंत्यविधीला उपस्थित राहू शकले नाहीत. सईदा बेगम यांचं निधन जयपूरमध्ये झाले, मात्र लॉकडाऊनमुळे ते मुंबईत अडकले होते. कोणताच पर्याय उपलब्ध नसल्यानं असहाय्य झालेल्या इरफान यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाणावलेल्या डोळ्यांनी आईला अखेरचा निरोप दिला होता.

- Advertisement -

हेही वाचा – त्याने घेतलेल्या अचानक एक्झिटने बॉलिवूड हळहळले!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -