Air India : एयर इंडियाच्या कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना मिळणार VRS, निवृत्तीनंतर एकाच वेळी मिळणार पैसे

Air India : एयर इंडियाच्या कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना मिळणार VRS, निवृत्तीनंतर एकाच वेळी मिळणार पैसे

एयर इंडियाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांना कंपनीकडून व्हिआरएस (Voluntary Retirement Scheme) चा पर्याय देण्यात आला आहे. जर कर्मचाऱ्याचे वय ५५ वर्षापेक्षा जास्त तसेच ज्यांनी २० वर्षांपेक्षा एयर इंडियाच्या कंपनीत काम केले आहे. असे कर्मचारी हा पर्याय निवडू शकतात. (Air India announces voluntary retirement scheme)

टाटा समूहाच्या ताब्यात जेव्हापासून एयर इंडिया गेली आहे. तेव्हापासून कंपनीमध्ये मोठे बदल झाले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात येत आहेत. सर्वात पहिले कंपनीतील व्यवस्थापन समितीमध्ये बदल करण्यात आले आहेत. यानंतर दुसऱ्या अधिकाऱ्यांचीसुद्धा उचलबांगडी करण्यात आली आहे. तर आता स्वेच्छा निवृत्तीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. तसेच आता कंपनीकडून अशी घोषणा करण्यात आली आहे की, जे कर्मचारी व्हिआरएससाठी अर्ज करतील त्यांना एक रक्कमी पैसे देण्यात येणार आहेत.

एयर इंडियामध्ये केबिन क्रू मेंबर्सच्या वयोमनात बदल करण्यात आले आहे. कू मेंबरचे वय ५५ वरुन आता ४० करण्यात आले आहे. जे एस-3, एस-5, एस-7, ई-0, ई-1, ई-2 ग्रेडमध्ये आहेत. कंपनीमध्ये काम करणाऱ्या अकुशल कामगारांसाठीसुद्धा हा नियम लागू राहणार आहे. जर कोणता कर्मचारी १ जूनपासून ३१ जुलैपर्यंत स्वेच्छा सेवानिवृत्तीसाठी अर्ज करत असेल तर त्यांना एकरक्कमी पैसे देण्यात येतील तसेच सानुग्रह अनुदान देण्यात येईल.


हेही वाचा : अयोध्या आणि मथुरेत दारु विक्रीवर बंदी, योगी सरकारचा मोठा निर्णय

First Published on: June 1, 2022 11:00 PM
Exit mobile version