Delhi Pollution: दिल्लीत वाढत्या प्रदूषणचा कहर, श्वास घेण्यास नागरिकांना होतोय भयंकर त्रास

Delhi Pollution: दिल्लीत वाढत्या प्रदूषणचा कहर, श्वास घेण्यास नागरिकांना होतोय भयंकर त्रास

दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये दिवसागणिक प्रदूषणचा कहर वाढत आहे. त्यामुळे हवेची गुणवत्ता पाहिली असता, येथील नागरिकांना श्वास घेण्यास सुद्धा भयंकर त्रास होत आहे. दिल्लीतील आसपासच्या राज्यांमध्ये फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आली होती. त्यामुळे दिल्लीतील प्रूदषण वाढले. दिल्लीत आज (शुक्रवार) हवेची गुणवत्ता ७०० पेक्षा अधिक आहे. तर आतापर्यंतचा आकडा पाहिला असता हा ३६० च्या आसपास आहे. राजधानीतील अनेक शहरांमध्ये रेड झोनची घोषणा करण्यात आली आहे.

सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँण्ड वेदर फॉरकास्टींग अँण्ड रिसर्च (SAFAR) यांच्या आकड्यांनुसार, दिल्लीतील संपूर्ण हवेची गुणवत्ता ३६० इतकी झाली आहे. त्यामुळे राजधानीतील हवेची गुणवत्ता प्रचंड खराब असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. हवेत धुक्याची चादर पसरली आहे. कुतुब मीनार, लोटस टेम्पल, अक्षरधाम मंदिराच्या जवळपासच्या विभागात धुके मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. खराब हवेमुळे येथील नागरिकांना श्वास घेण्यास कंबर कसावी लागत आहे.

या दोन शहरांमध्ये प्रदूषणाची लाट

दिल्लीतील संपूर्ण हवेची गुणवत्ता ३६० इतकी आहे. राजधानीतील वजीरपूर आणि जहांगीरपूरी या दोन महत्त्वाच्या शहरांमध्ये शुक्रवारी एक्यूआय ७०० पेक्षा अधिक नोंदवण्या त आला आहे. त्यामुळे दिल्लीतील प्रदूषण हे इतर तुलनेने जास्त आहे.


हेही वाचा: भारत २०३१ मध्ये आयसीसी वनडे वर्ल्ड कप आयोजित करण्याची शक्यता, जाणून घ्या कधी होणार World Cup?


 डॉ. अरविंद कुमार यांनी व्यक्त केली चिंता 

दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावर ICS-मेदांता हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. अरविंद कुमार यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, लंग्स केअर फाऊंडेशनच्या अभ्यासानुसार किशोरवयीन मुलांच्या छातीमध्ये ५० टक्क्यांहून अधिक संसर्गाची लक्षणे आढळून आली आहेत. २९ टक्के लोकांना दमा असून ४० टक्के किशोरवयीन मुलं लठ्ठ आहेत. त्यामुळे २०० टक्क्यांनी मुलांमध्ये दम्याचा धोका अधिक आहे. कोरोना विषाणूपेक्षा दिल्लीत प्रदूषणामुळे जास्त प्रमाणात मृत्यू झाले आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी स्मॉग टॉवर लावणं हा उपाय नाही, असे डॉ. अरविंद म्हणाले आहेत.

दरम्यान, दिल्लीमध्ये दिवसागणिक हवेच्या प्रमाणात बदल होताना दिसत आहेत. या वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी काही पर्याय आहे का? याकडे केजरीवाल सरकारने पाहणं महत्त्वाचं आहे. कारण राजधानीतील दोन प्रमुख शहरांसह आसपासच्या भागांत सुद्धा हवेची गुणवत्ता खराब होत असून नागरिकांच्या प्रकृतीत त्याचा गंभीर परिणाम होताना दिसत आहे.

First Published on: November 12, 2021 1:22 PM
Exit mobile version