घरक्रीडाभारत २०३१ मध्ये आयसीसी वनडे वर्ल्ड कप आयोजित करण्याची शक्यता, जाणून घ्या...

भारत २०३१ मध्ये आयसीसी वनडे वर्ल्ड कप आयोजित करण्याची शक्यता, जाणून घ्या कधी होणार World Cup?

Subscribe

२०२३ मध्ये भारत आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपचं आयोजन करणार

नवी दिल्ली : भारत २०३० च्या दशकापूर्वी ५० ओव्हरचं वर्ल्ड कप (ICC ODI World Cup) आयोजित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. बीसीसीआयला २०३१ मध्ये क्रिकेट वर्ल्ड कपचं आयोजन करण्याचा अधिकार मिळणार आहे. आयसीसी पुरूष टी-२० वर्ल्ड कप २०२१ (ICC T20 World Cup 2021) आयोजित करण्याचा अधिकार भारताला मिळाला होता. परंतु कोरोना विषाणूच्या महामारीमुळे बीसीसीआयला हे आयोजन यूएई आणि ओमानमध्ये करावं लागलं. २०१६ मध्ये भारताने आयसीसी पुरूष टूर्नामेंट आयोजित केली होती. आयसीसीकडून नवनवीन देशांना मेगा इवेंट्स करण्यासाठी होस्टींगचे अधिकार देण्यात येणार आहेत. या वर्षाच्या सुरूवातीला, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने २०२४ ते २०३१ पर्यंत वर्ल्ड कप टूर्नामेंटच्या कार्यक्रमांची घोषणा केली आहे. भारत २०२३ मध्ये आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपचं आयोजन करणार आहे. तसेच २०२४ मध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकपसोबत एक नवीन चक्र सुरू होणार आहे.

क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त राज्य अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्याद्वारे आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२४ चं आयोजन करू शकतो. यामध्ये २० संघ एकत्रित खेळणार आहेत. या टूर्नामेंटमध्ये एकूण ५५ सामने खेळवण्यात येणार आहेत. २०२१ आणि २०२२ मध्ये वर्ल्ड कपच्या दरम्यान १६ संघांमध्ये ४५ सामने होतील. २०२७ आणि २०३१ क्रिकेट वनडे विश्व कपमध्ये संघांची एकूण संख्या १४ इतकी होईल. आताची संख्या पाहिली असता ही १० आहे. आयसीसीच्या आयोजनाबाबत आतापर्यंत कोणतीही अपडेट समोर आलेली नाहीये. संयुक्त राज्य अमेरिका आणि वेस्ट इंडिज हे दोन संघ आयसीसी टूर्नामेंटचं आयोजन करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

संयुक्त राज्य म्हणून अमेरिकेची निवड?

आयसीसीचं लक्ष आता अमेरिकेवर आहे. कारण ही स्पर्धा २०२८मध्ये लॉस एन्जिल्स या शहरात आयोजित केली जाऊ शकते. आयसीसीने पहिल्यापासूनच २०२८ च्या ऑलंपिकचा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे आयसीसीची नजर आता अमेरिकेच्या बाजारावर आहे.

जाणून घ्या कधी होणार World Cup?

२०२७ आणि २०३१ मध्ये ५० ओव्हरच्या वर्ल्ड कपसह आयसीसीचं आयोजन करण्यात येण्याची शक्यता आहे. क्रिकेट संस्था ५० ओव्हरच्या दोन चॅम्पियन ट्रॉफी २०२५ आणि २०२९ च्या असणार आहेत. टी-२० वर्ल्ड कप २०२६, २०२८ आणि २०३० मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. तर WTC २०२५, २०२७, २०२९ आणि २०३१ मध्ये फायनल करण्यात आली आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज व्यतिरिक्त भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंड हे सुद्धा देश आयसीसी टूर्नामेट आयोजित करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -