‘एअर स्ट्राईकचे’ पुरावे द्या; शहीद जवानाच्या पत्नीची मागणी

‘एअर स्ट्राईकचे’ पुरावे द्या; शहीद जवानाच्या पत्नीची मागणी

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील भ्याड हल्ला

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात खरोखर भ्याड हल्ला झाला आहे. या हल्ल्यात माझे पती शहीद झाले असून मी त्यांचे शव स्वत:च्या डोळ्यांनी पाहिले आहे. या हल्ल्याचे भारतीय हवाई दलाने पाकिस्तानाला चोखप्रत्युत्तर दिले आहे. तसेच या हल्ल्यामध्ये भारताने जैश-ए-मोहम्मद कॅम्पवर एअर स्ट्राइक करुन दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले असेल तर त्याचे पुरावे सरकार का सादर करत नाही? असा प्रश्न पुलवामात शहीद झालेले जवान राम वकील यांच्या पत्नी गीता देव यांनी सरकारला विचारल्या आहे. शामलीच्या प्रदीप कुमार यांच्या पत्नी सर्मिष्ठा देवी यांनीही एअर स्ट्राईकचे पुरावे मागितले होते.

लवकरात लवकर पुरावे द्या

पुलवामा जिल्ह्यात १४ फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात ४० हून अधिक जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यानंतर १२ दिवसांनी भारतीय हवाई दलाने या हल्ल्याचे चोखप्रत्युत्तर देत जैशच्या दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलाने बॉम्ब वर्षाव केला. या बॉम्बवर्षावात जवळपास ३५० दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दिले आहे. ‘जर इतक्या मोठ्या संख्येने लोक खरोखर मेले असतील तर त्याचे पुरावे काय? कोणाला दिसले तरी असतील. या एअर स्ट्राइकचे लवकरात लवकर पुरावे देण्यात यावेत. अन्यथा आम्ही कारवाईवर विश्वास कसा ठेवणार’, असा सवाल गीता यांने उपस्थित केला आहे. आता सरकार या घटनेचे पुरावे कधी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच मणिपुरीच्या राम वकिल यांना तीन मुले आहेत. या तिघांचीही जबाबदारी आता गीता देवींवर पडली आहे..


वाचा – पुलवामानंतर मुंबई सावध

वाचा – पाकचा कांगावा; पुलवामा हल्ल्यामध्ये ‘जैश’चा हात नाही


 

First Published on: March 6, 2019 4:28 PM
Exit mobile version