बेपत्ता एएन – ३२ विमानातील सर्वांचा मृत्यू

बेपत्ता एएन – ३२ विमानातील सर्वांचा मृत्यू

वायुदलाचे एएन-३२ विमान

अरुणाचलच्या सियांग जिल्ह्यामध्ये भारतीय वायुदलाचे दुर्घटनाग्रस्त एएन ३२ विमानातून प्रवास करणाऱ्या सर्व १३ जवानांचा मृत्यू झाला आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, सिंयाग जिल्ह्याती डोंगराळ भागामध्ये विमानाचे अवशेष सापडले. अवशेषाच्या ठिकाणी गेलेल्या बचाव दलाने विमानातील सर्व जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. या विमान अपघातामध्ये दुर्देवी मृत्यू झालेल्या सर्व जवानांच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली आहे. या आधी १५ सदस्यांचे बचाव दल आज सकाळी विमानाच्या अवशेषांच्या ठिकाणी पोहचले. अवशेषांची तपासणी केल्यानंतर विमानातून प्रवास करणारा एकही जण जिवंत सापडला नाही.

याआधी विमानाच्या अवशेषापर्यंत पोहचण्यासाठी बुधवारी एक १५ सदस्यांची विशेषतज्ज्ञांना हेलिड्रॉप करण्यात आले होते. या दलामध्ये एअरफोर्स, लष्कराचे जवान आणि गिर्यारोहक यांचा समावेश होता. बचाव दलाला आधी एअरलिफ्ट करुन विमानाच्या अवशेषाजवळ नेऊन त्यानंतर त्यांना हेलिड्रॉप करण्यात आले. याआधी मंगळवारी भारतीय वायुसेनाचे बेपत्ता विमान एएन ३२ चे अवशेष अरुणाचलच्या सियांग जिल्ह्यामध्ये दिसून आले. विमान ज्याठिकाणि दुर्घटनाग्रस्त झाले त्याठिकाणचा परिसर उंच डोंगराळ रांगा आणि दाट जंगलाचा होता. अशामध्ये दुर्घटनाग्रस्त विमानाच्या अवशेषापर्यंत पोहचणे हे आव्हानात्मक होते.

First Published on: June 13, 2019 1:46 PM
Exit mobile version