UP Election 2022 : सायकलचा अपमान हा देशाचा अपमान, अखिलेश यादव मोदींवर कडाडले

UP Election 2022 : सायकलचा अपमान हा देशाचा अपमान, अखिलेश यादव मोदींवर कडाडले

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद बॉम्बस्फोटचा उल्लेख करत अखिलेश यादव आणि समाजवादी पार्टीवरही हल्लाबोल केला होता. ज्या पक्षाचं चिन्ह सायकल आहे. त्यावर अहमदाबादमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले होते. अशा प्रकारचं वक्तव्य नरेंद्र मोदींनी हरदोई येथील जनतेला संबोधित करताना केलं होतं. दरम्यान, सायकलचा अपमान हा देशाचा अपमान, असं म्हणत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मोदींवर पलटवार केला आहे.

अखिलेश यादव यांनी ट्विट करत म्हटलंय की, शेत आणि शेतकऱ्यांना जोडून त्यांच्या समृद्धीचा पाया घातला. आमची सायकल ,सामाजिक बंधने तोडून मुलींना शाळेपर्यंत पोहोचवते. महागाईमुळे आमच्या सायकलचा त्यावर काहीही परिणाम होत नाही. ती वेगाने धावते आणि आमची सायकल हे सर्वाचं विमान आहे. सामान्य लोकांचा आणि ग्रामीण भारताचा अभिमान आहे. परंतु सायकलचा अपमान हा देशाचा अपमान आहे. असा पलटवार अखिलेश यादव यांनी केलाय.

काय म्हणाले होते मोदी ?

नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद बॉम्बस्फोटचा उल्लेख करत अखिलेश यादव आणि समाजवादी पार्टीवर निशाणा साधला होता. ज्या पक्षाचं चिन्ह सायकल आहे. त्यावर अहमदाबादमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले होते. तेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. मला हेच समजत नाहीये की, दहशतवादी बॉम्बस्फोट हल्ले घडवताना सायकलचा वापर का करतात, असा सवाल मोदींनी उपस्थित केला.

जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. तेव्हा अहमदाबादमध्ये साखळी बॉम्बस्फोट हल्ले घडवून आणले होते. त्या दिवसाला मी कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे त्याच दिवशी मी संकल्प केला की, माझं सरकार या दहशतवाद्यांना पातळातून सुद्धा शोधून काढील, असं म्हणत मोदींनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला होता.

दरम्यान, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव करहल मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री एस. पी. सिंह बघेल निवडणूक लढवत आहेत.


हेही वाचा : International Mother Lang


uage Day 2022: आज जागतिक मातृभाषा दिन, या दिवसाचं महत्त्व आणि इतिहास काय?, जाणून घ्या

First Published on: February 21, 2022 12:48 PM
Exit mobile version