घरताज्या घडामोडीInternational Mother Language Day 2022: आज जागतिक मातृभाषा दिन, या दिवसाचं महत्त्व...

International Mother Language Day 2022: आज जागतिक मातृभाषा दिन, या दिवसाचं महत्त्व आणि इतिहास काय?, जाणून घ्या

Subscribe

संपूर्ण जगभरात जागतिक मातृभाषा दिवस २१ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. मातृभाषेच्या मदतीने प्रादेशिक भाषा समजून घेण्यास आणि ऐकमेकांशी संवाद साधण्यास मदत होते. जगभरातील भाषा आणि सांस्कृतिक विविधता जोपासणे आणि त्याबाबत जागरूकता निर्माण करणे, हा या दिवसाचा उद्देश आहे.

या दिवसाचं महत्त्व आणि इतिहास काय?

जगभरात सुमारे ७ हजार भाषा बोलल्या जातात. तसेच भारतातही प्रामुख्याने २२ भाषा बोलल्या जातात. १७ नोव्हेंबर १९९९ रोजी युनेस्कोने आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा करण्याची घोषणा केली आणि २००० मध्ये पहिल्यांदा हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्यात आला.

- Advertisement -

२१ फेब्रुवारीला हा दिवस साजरा करण्याबाबत कॅनडामध्ये राहणारे बांगलादेशी रफीकुल इस्लाम यांच्याकडून सुचवण्यात आले. रफीकुल इस्लाम यांनी १९५२ मध्ये बांगला भाषेच्या आंदोलनादरम्यान ढाकामध्ये झालेल्या नृशंस हत्येच्या स्मरणार्थ हा दिवस प्रस्तावित करण्यात आला होता. ढाका विद्यापीठातील आंदोलनावर २१ फेब्रुवारी १९५२ मध्ये गोळीबार करण्यात आला होता. आंदोलनाच्या परिणामी पाकिस्तान सरकारने बंगाली भाषेला मान्यता दिली.

मातृभाषा दिनाची थीम काय?

आंतरराष्ट्रीय भाषेच्या महत्त्वाची थीम बहुभाषिक शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि आव्हानांसह संधी अशी आहे. या दिवशी जगभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. शिक्षण आणि साहित्याशी निगडीत लोक विविध भाषांबद्दल चर्चा करतात. भाषेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि भाषिक विविधता जोपासणे, अशा प्रकारचे महत्त्वदेखील अधोरेखित करण्यात आले आहेत.

- Advertisement -

आकडेवारीमध्ये किती भाषांचा समावेश?

संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार, जगात जवळपास ६ हजार ९०० भाषा बोलल्या जातात. यापैकी ९० टक्के भाषा या एक लाखांहून कमी प्रमाणात बोलल्या जातात. मात्र, ६९०० पैकी ४३ भाषांचा वापर करणं किंवा त्यामधून संवाद करणं ही चिंतेची बाब असल्याचं म्हटलं जातंय.

सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या भाषा कोणत्या?

जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषा इंग्रजी, जपानी, स्पॅनिश, हिंदी, बंगाली, रशियन, पंजाबी, पोर्तुगीज, अरबी इत्यादी भाषांचा समावेश आहे. जागतिकीकरणाच्या या युगात रोजगाराच्या चांगल्या संधीसाठी परदेशी भाषांचा वापर केला जातो.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मातृभाषेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


हेही वाचा : सांगलीच्या सुपुत्राला अखेरचा निरोप, शहीद रोमित चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -