Video : काश्मीर, बाबरी, जिहाद… अल-कायदाच्या नव्या व्हिडिओतून भारताविरोधात चिथावणीखोर वक्तव्ये

Video : काश्मीर, बाबरी, जिहाद… अल-कायदाच्या नव्या व्हिडिओतून भारताविरोधात चिथावणीखोर वक्तव्ये

Video : काश्मीर, बाबरी, जिहाद... अल-कायदाच्या नव्या व्हिडिओतून भारताविरोधात चिथावणीखोर वक्तव्ये

मागील काही दिवसांपासून पाकिस्तानी दहशतवादी संघटनांकडून काश्मीरमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यातच आता भारतीय गुप्तचर यंत्रणांना चकवा देण्यासाठी दहशतवादी संघटनांकडून नवी चाल खेळली जात आहे. गुप्त सुत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तान अधिकृत काश्मीर खोऱ्यात दहवादी कारवायांचे ट्रेनिंग देण्यासाठी लष्कर-ए-तोय्यबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांनी आपल्या नावात बदल केले आहेत.

लष्कर-ए-तोय्यबाने नाव बदलून Al Burq केलेय, तर जैश-ए-मोहम्मद संघटनेने Al umar Mujahedeen ठेवले आहेत. आंतरराष्ट्रीय दबावापासून वाचण्यासाठी पाकिस्तानकडून ही चाल खेळली जात आहे. अशातच काश्मीर मुद्द्यावर अल-कायदा इंडियन सब कॉन्टिनेंटने नवा व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये भारताविरोधात चिथावणीखोर वक्तव्ये करण्यात आली आहेत. ज्यामध्ये जिहाद मुद्द्यावरून भारतात तेढ निर्माण करण्याचे सांगितले जात आहे.

अल-कायदा मीडिया विंग As Sahab चॅनेलने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओची सुरुवात अल-कायदाचा चीफ अल जवाहिरच्या वक्तव्याने होते. यानंतर ५ आतंकवादी हातात बंदूक रोखून दिसतात. ज्यामध्ये एक दहशतवादी असे म्हणताना ऐकायला येतेय की, माझे नाव मीर महिबुल्ला आहे, मी काश्मीरचा आहे. यानंतर तो काश्मीरमधील जिहादबद्दल बोलताना दिसतोय.

या व्हिडीओमध्ये भारत सरकारच्या विरोधात जिहाद करण्याचे सांगितले जात आहे. तसेच झाकीर मुसाचीही उल्लेख केला आहे. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, जरी हा व्हिडिओ अल कायदाने जारी केला असला, तरी त्यामागे पाकिस्तानचा हात आहे. दहशतवादी या प्रचार व्हिडिओद्वारे काश्मीरमधील तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करताना दिसतायत. व्हिडिओमध्ये बाबरी मशीद पाडल्याबद्दलही बोलले जात आहे. तसेच भारताविरोधात चिथावणीखोर वक्तव्ये करत भारतीयांना भडकवण्याचा प्रयत्न केले जात आहे. या व्हिडिओबाबत गुप्तचर संस्था अधिकच सतर्क झाल्या आहेत. हा व्हिडिओ १ मिनिट ३० सेकंदांचा आहे.


‘मोनो’ प्रवास होणार ‘सुपरफास्ट’, वर्षभरात १० स्वदेशी मोनोरेलच्या ताफ्यात होणार दाखल


First Published on: October 12, 2021 4:10 PM
Exit mobile version