सावधान! Dominos च्या १८ कोटी ग्राहकांचा चोरी झालेला डेटा आता विकला जातोय

सावधान! Dominos च्या १८ कोटी ग्राहकांचा चोरी झालेला डेटा आता विकला जातोय

सावधान! Dominos च्या १८ कोटी ग्राहकांचा चोरी झालेला डेटा आता विकला जातोय

गेल्या महिन्यात डोमिनोज या प्रसिद्ध पिज्जा कंपनीच्या १८ कोटी भारतीय ग्राहकांचा डेटा चोरीला गेल्याची माहिती आता सार्वजनिक झाली आहे. हॅकर्सनी आता डार्क वेबवर या डेटासाठी सर्च इंजिन बनविले आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून ग्राहकांची खाजगी माहिती सहज उपलब्ध होऊ शकतेय. यात काही लोकांचे मोबाइल नंबर, ईमेल आयडी आणि जीपीएस लोकेशनची माहिती लगेच उपलब्ध होत आहे.

कंपनीच्या सर्व्हरमधून  १३ टीबी डेटा चोरी 

सायबर सुरक्षा तज्ज्ञ राजेश्वर राजहरिया यांच्या मते, तुम्ही जेव्हा डोमिनोजमधून ऑनलाईन ऑर्डर करता तेव्हा तुमची माहिती चोरीला जात असल्याची शक्यता आहे. ग्राहकांचा सार्वजिनक केलेल्या डेटाचा उपयोग आता हेरगिरीसाठी होत आहे. या माध्यमातून ग्राहकांचा मोबाईल नंबर सर्च करत त्यांचे लोकेशन, ऑर्डरची तारीख आणि वेळेची माहिती मिळवली जाऊ शकते. परंतु या प्रकारातून ग्राहकांच्या माहितीच्या गोपनियतेच्या धोरणाचे उल्लंघनृ सुरु आहे. राजहरिया यांनी एका स्क्रीनशॉर्ट टाकत यात हॅकर्स चोरलेल्या डेटाचा वापर करत ग्राहकांचे लोकेशन मॅप बनत असल्याचे स्पष्ट केले.

१० लाख क्रेडिट कार्ड तपशीलांचाही समावेश

हॅकर्सनी एप्रिल महिन्यात भारतातील डोमिनोजच्या सर्व्हरमधील १३ टेराबाइट (टीबी) डेटा चोरी केल्याचा दावा केला आहे. यावेळी हॅकर्सनी २५० कर्मचारी आणि १८ कोटी ग्राहकांची वैयक्तिक माहिती हस्तगत केली आहे. यात ग्राहकांचे फोन नंबर, पत्ता, ई-मेल, पेमेंट केलेल्याची माहिती आणि क्रेडिटकार्डची डिटेल समाविष्ट आहे.

डोमिनोसच्या मालकीची असलेली जुबिलियंट फूड वर्क्सने हॅकर्सने ग्राहकांची खासगी माहिती चोरत वेबसाईटच्या गोपनियतेच्या धोरणाचे उल्लंघन केल्याचे कबूल केले. परंतु ग्राहकांची ऑनलाईन पेमेंट संदर्भातील माहिती लीक झाली नसल्याचे सांगितले, यातून असा युक्तिवाद केला जात आहे की, हॅकर्स ग्राहकांच्या ऑनलाईन पेमेंट संदर्भा त तपशील गोळा करीत नाहीत.

सिक्योरिटी फर्म असणाऱ्या हडसन रॉकचे सीटीओ एलोन गॅल यांनी एप्रिलमध्ये असे जाहीर केले होते की, हॅकर्स ही माहिती विकत असून यासाठी एक सर्च पोर्टलची योजना आखत आहेत. हडसनच्या म्हणण्यानुसार, या चोरी झालेल्या डेटामध्ये १ दशलक्ष क्रेडिट कार्डामधून ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या ग्राहकांच्या क्रेडिट कार्डचीही माहिती आहे.


“राजभनवात भुताटकीचा वावर, शांती यज्ञ करा” सेनेचा राज्यपालांना खोचक सल्ला


 

First Published on: May 24, 2021 10:04 AM
Exit mobile version