Alexa ने लहान मुलीला दिला जीवघेणा टास्क, Amazon ला मागावी लागली माफी

Alexa Dangerous Challenge एलेक्सा वॉईस असिस्टंटने एका दहा वर्षाच्या मुलीला जीवघेणा टास्क दिला. ज्यात विजेचा प्रवाह वाहून नेणाऱ्या प्लगवर धातुचे नाणे ठेवायचे होते. या टास्क मध्ये विजेचा धक्का लागून मुलीचा मृत्यू होण्याचाही धोका होता. यामुळे या घटनेवर अॅमेझॉनला माफी मागावी लागली आहे.

क्रिस्टीन लिवडाल या ट्विटर यूजरने एक टि्वट केले आहे. ज्यात त्याने या घटनेची माहिती शेअर केली. ज्यामुळे इतर कोणालाही अशा भयंकर परिस्थितीला सामोरे जावे लागणार नाही. क्रिस्टीनने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की तिच्या १० वर्षाच्या मुलीने एलेक्सा इनेबल्ड इकोला (Echo)एका चॅलेजबद्दल विचारले होते. त्यावर हा टास्क फार सोपा असल्याचे Alexa ने म्हटले. त्यानंतर एलेक्साने मुलीला मोबाईल चार्जरचा अर्धा भाग पॉवर आऊटलेटमध्ये प्लग करायला सांगितला. नंतर बाहेर आलेल्या चार्जरच्या अर्ध्या भागावर धातुचे नाणे ठेवायला सांगितले. मुलीने याबद्दल क्रिस्टीनला सांगितले. त्यानंतर हा प्रकार समोर आला. यावर यूझर्सनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर यावर अमेझॉनने Amazon Alexa बगमुळे हे झाल्याचे स्पष्टीकरण दिले असून माफी मागितली आहे.

 

First Published on: December 30, 2021 5:02 PM
Exit mobile version