महिला कर्मचाऱ्यावरील लैंगिक छळाची बातमी झाली लीक; अलीबाबा कंपनीतील १० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

महिला कर्मचाऱ्यावरील लैंगिक छळाची बातमी झाली लीक; अलीबाबा कंपनीतील १० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

महिला कर्मचाऱ्यावरील लैंगिक छळाची बातमी झाली लीक; अलीबाबा कंपनीतील १० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

चीनमधील जगप्रसिद्ध ई-कॉमर्स अलीबाबा ग्रुप होल्डिंग लिमिटेड कंपनीतील महिला कर्मचाऱ्यावरील लैंगिक छळाची बातमी लीक केल्याप्रकरणी १० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केल्याची माहिती समोर येत आहे. या महिला कर्मचाऱ्याने एका माजी व्यवस्थापकावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. या आरोपांनंतर महिला कर्मचाऱ्याचे इंटरनल अकाउंट सार्वजनिक केल्याप्रकरणी या १० कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे. या दहा कर्मचाऱ्यांना आता नोकरीवरून काढून टाकले आहे.

ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, अलीबाबा ग्रुप हेल्डिंग लिमिटेडने एका माडी व्यवस्थापकावर लैंगिक छळाचे आरोप केल्यानंतर तिचे इंटरनल अकाउंट या १० कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक केले. त्यामुळे दहा कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. काही दिवसांपूर्वी या महिला कर्मचाऱ्याने लैंगिक छळाचे आरोप केल्यानंतर अलीबाबा कंपनीने व्यवस्थापकाचे निलंबन केले.

अलीबाबा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनियल झांग यांनी सांगितले की, एका महिला कर्मचाऱ्याने व्यवस्थापकावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. यानंतर तपासादरम्यान कंपनीने संबंधित व्यवस्थाकाला काढून टाकले आहे. या व्यवस्थापकावरील कारवाईनंतर काही कर्मचाऱ्यांनी महिलेचे इंटरनल अकाउंट सार्वजनिक केले. अशी माहिती देण्यात आली.

या कर्मचाऱ्यांवर सार्वजनिक डोमेनमध्ये महिलेच्या पोस्टचे स्क्रीनशॉट शेअर करण्यात आरोप आहे. या कंपनीत जवळपास २५०,००० कर्मचारी काम करतात. लैंगिक छळ झालेल्या महिला कर्मचाऱ्याची ओळख सार्वजनिक केल्यामुळे ही मोठी कारवाई केली आहे.

याप्रकरणी कंपनीने आरोपी व्यवस्थापकाची हकालपट्टी केल्यानंतर दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. परंतु या प्रकरणामुळे कॉर्पोरेट क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यावर कंपनीने स्पष्ट केले की, सर्व कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित वर्कप्लेस सुनिश्चित करणे हे कंपनीचे सर्वोच्च प्राधान्य आहे.


First Published on: August 31, 2021 12:34 PM
Exit mobile version