ज्या दिवशी Amazon सुरू केले, त्याच दिवशी Jeff Bezos यांनी CEO पद सोडणार, जाणून घ्या आतापर्यंतचा प्रवास

ज्या दिवशी Amazon सुरू केले, त्याच दिवशी Jeff Bezos यांनी CEO पद सोडणार, जाणून घ्या आतापर्यंतचा प्रवास

ज्या दिवशी Amazon सुरू केले, त्याच दिवशी Jeff Bezos यांनी CEO पद सोडणार, जाणून घ्या आतापर्यंतचा प्रवास

‘मी आपली नोकरी सोडून काही वेगळे करू पाहत होतो. माझे स्वप्न पूर्ण करावे, अशी माझी पत्नीची इच्छा होती. त्यामुळे मी माझे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. मी प्रयत्न केला नाही, याबाबत मला दुःख करायचे नाही. परंतु मी जर प्रयत्न केला नसता, तर मला खेद वाटला असता,’ असे Amazonचे संस्थापक जेफ बेजोस (Jeff Bezos) २०१०मध्ये प्रिंसटन युनिव्हर्सिटीमध्ये म्हणाले होते. याच युनिव्हर्सिटीमधून बेजोस यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्सची डिग्री घेतली होती. आज अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्या कार्यकारी अध्यक्षपदाचा शेवटचा दिवस आहे. त्यांच्या जागी अँडी जेसी (Andy Jassy) नवे कार्यकारी अध्यक्ष (CEO) बनतील. आजच्याच दिवशी २७ वर्षांपूर्वी ५ जुलै १९९४ साली जेफ बेजोस यांनी एक छोट्याशा गॅरेजमध्ये Amazon सुरू केले होते. परंतु आज Amazon जगातील टॉप ५ कंपनीनमध्ये आहे. जेफ बेजोस आजचे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

नोकरी सोडून सुरू केले Amazon

जून १९९४ साली बेजोस यांनी नोकरी सोडली आणि ५ जुलै १९९४ साली एका गॅरेजमध्ये Amazonला सुरुवात केली. सुरुवातील Amazonमध्ये जुनी पुस्तके मिळत होती. Amazonच्या रिपोर्टनुसार, १९९७ सालच्या अखेरपर्यंत कंपनीचे १५०हून जास्त देशांमध्ये १५ लाखांहून जास्त ग्राहक होते. सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये कंपनीचे नुकसान झाले. परंतु नंतर कंपनीला खूप मोठा नफा होऊ लागला. २०२२मध्ये Amazonचे ३.८६ लाख मिलियन डॉलर (२८.७६ लाख कोटी रुपये)ची कमाई झाली आणि कंपनीने २१,३३१ मिलियन डॉलर (१.५८ लाख कोटी रुपये)चा नफा झाला.

वडिलांच्या गॅरेजमध्ये जेव्हा बेजोस यांनी Amazon सुरू केले होते, तेव्हा त्यांनी असा अजिबात विचार केला नव्हता की, आपली जगातील सर्वात मोठी कंपनी होईल. माध्यमाच्या वृत्तानुसार, कंपनी सुरू झाल्यानंतर तीन वर्षांनी कंपनीचे मार्केट कॅप १ अब्ज डॉलरवर पोहोचले होते. सप्टेंबर २०१८ मध्ये Amazonचे मार्केट कॅप १ ट्रिलियन डॉलरवर पोहोचले. सर्वात जास्त मार्केट कॅपमध्ये Amazon चौथ्या नंबरवर आहे.

१९९९मध्ये पहिल्यांदा जेफ बेजोस फोर्ब्सच्या लिस्टमध्ये आले होते. त्यावेळेस जगातील १९वे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते आणि त्यावेळीस त्याचे नेटवर्थ १० अब्ज डॉलरच्या आसपास होते. परंतु आज बेजोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि त्याचे नेटवर्थ २०० अब्ज डॉलरहून अधिक आहे.

First Published on: July 5, 2021 8:09 PM
Exit mobile version