दहशतवादाला नष्ट करण्यासाठी लोकसभेत मोठा कायदा मंजूर

दहशतवादाला नष्ट करण्यासाठी लोकसभेत मोठा कायदा मंजूर

केंद्रिय गृहमंत्री अमित शहा

केंद्रिय गृहमंत्री अमित शहांनी आपल्या मंत्रीपदाची सुत्रे हाती घेतल्यापासून दहशतवादाला नष्ट करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करताना दिसत आहेत. दहशतवादाच्या पार्श्वभूमीवरच बुधवारी लोकसभेत बेकायदा प्रतिबंधक हालचाली (सुधारणा) विधेयक २०१९ (युएपीए) मंजूर करण्यात आला आहे. या विधेकायवर लोकसभेत बरीच चर्चा झाली. यावेळी अमित शहांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ‘काँग्रेसकडून या कायद्याला विरोध होत असला तरी १९६७ साली इंदिरा गांधी यांचे सरकार असताना हा कायदा लागू आणला गेला होता’, असे अमित शहा म्हणाला आहे.

‘अर्बन दहशतवाद वाढवणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार’

अमित शहांनी दहशतवादाला चालणा देणाऱ्या विविध घटकांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी अर्बन दहशतवादावरही टीका केली. या शिवाय जो कुणी अर्बन दहशतवादाला चालना देणारे कृत्य करेल त्याच्या विरोधात कठोर कारवाई होईल, असेही अमित शहा म्हणाले आहेत. त्याचबरोबर या कायद्यानुसार आता दहशतवादी कारवायांमध्ये भाग घेणाऱ्या आणि दहशतवादी कारवायांसाठी मदत करणाऱ्यांना दहशतवादी घोषित करण्यात असल्याचे अमित शहा म्हणाले आहेत. यापुढे ते म्हणाले की, ‘दहशतवाद्यांवर कठोर कारवाई नव्हे तर चर्चा करुन नियंत्रण आणले जाऊ शकते, या विचारांशी कोणीही सहमत नाही.’ त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीकडे बंदूक असली म्हणजे तो दहशतवादी बनू शकत नाही, तर त्याच्या डोक्यात दहशतवादी विचार असल्यामुळे तो दहशतवादी बनतो.


हेही वाचा – भारत-पाकिस्तान फाळणीसारखी चूक आम्ही करणार नाहीत – अमित शहा

First Published on: July 24, 2019 7:46 PM
Exit mobile version