घरदेश-विदेशभारत-पाकिस्तान फाळणीसारखी चूक आम्ही करणार नाहीत - अमित शहा

भारत-पाकिस्तान फाळणीसारखी चूक आम्ही करणार नाहीत – अमित शहा

Subscribe

अमित शहांनी संसदेत काँग्रेसवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी भारत-पाकिस्तान फाळणीचा मुद्दा पुढे आणला. याशिवाय मोदी सरकार तशी चूक करणार नसल्याचे शहा म्हणाले.

मोदी सरकारच्या दुसऱ्या सत्राचे पहिले अधिवेशन चांगलेच गाजताना दिसत आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान होणारे आरोप-प्रत्यारोप, टीका-टिप्पणी आता लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनातही पाहायला मिळत आहे. केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी संसदेत भारत-पाकिस्तान फाळणीवरुन काँग्रेसवर निशाना साधला. ‘काँग्रेस समुजतदारपणाची भाषा करते. मात्र, भारताची फाळणी कोणी केली? हे मला अगोदर सांगावे’, असे अमित शहा म्हणाले. याशिवाय काँग्रेसमुळेच जम्मू-काश्मीरमधील एक तृतीयांश जनता सरकारच्या विरोधात आहे, असा आरोप शहांनी केला.

नेमकं काय म्हणाले अमित शहा?

अमित शहांनी काँग्रेसच्या नेतृत्त्वावर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या प्रमुखांनी संपूर्ण गोंधळ केल्याचे अमित शहा म्हणाले. संसदेत शहा यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रिय मंत्री मनिष तिवार यांना काँग्रेसच्या नेतृत्त्वाबाबत प्रश्न विचारला. ‘मनिषजी देशाची फाळणी कोणी केली? ही एक मोठी चूक होती. आम्ही तशी चूक करणार नाहीत. जम्मू-काश्मीरचा एक तृतीयांश भाग आमच्यासोबत नाही. ते कुणामुळे?’, असा प्रश्न शहांनी तिवारी यांना विचारला.

- Advertisement -

जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट वाढवण्याचा अमित शहांचा प्रस्ताव

जम्मू-काश्मीरमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. ही राष्ट्रपती राजवट आणखी सहा महिन्यांनी वाढवावी, असा प्रस्ताव अमित शहांनी शुक्रवारी लोकसभेत मांडला. मात्र, या प्रस्तावाचा विरोधकांनी विरोध केला. गृहमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर अमित शहा बुधवारी पहिल्यांदाच जम्मू-काश्मीर दौऱ्यावर होते. यावेळी फुटीरतावादी नेत्यांनी काश्मीर बंदची हाक दिली होती. याशिवाय दहशतवाद हा काश्मीरमधील भळभळता प्रश्न आहे. त्यामुळे राष्ट्रपती लागवट आणखी सहा महिन्यांनी वाढवावी, असा प्रस्ताव अमित शहांनी संसदेत मांडला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -