कोरोनाच्या लक्षणातही राहिला ऑनड्युटी, सुपर स्प्रेडरने घेतला ७ जणांचा जीव, तर ३०० जण क्वारंटाईन

कोरोनाच्या लक्षणातही राहिला ऑनड्युटी, सुपर स्प्रेडरने घेतला ७ जणांचा जीव, तर ३०० जण क्वारंटाईन

प्रातिनिधीक फोटो

संपूर्ण जगात कोरोनाचा कहर सुरूच आहे. दरम्यान अमेरिकेतील काही भागात कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे एकच खळबळ माजली आहे. यामध्ये सात जणांना मृत्यू झाला तर शेकडो लोकांना कोरोना व्हायरसची लागण होण्याचा धोका असल्याचे सांगितले जात आहे. तसेच सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्याने दिलेल्या माहिती नुसार, एका कोरोना बाधित व्यक्तीने “सुपर स्प्रेडर एक्शन” च्या माध्यमातून या नव्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा फैलाव केला आहे.

कोरोनाची लक्षणं दिसूनही कामावर हजर…

अमेरिकेतील डग्लस काऊन्टीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, कोरोनाची लक्षणे असूनही एक माणूस मुद्दाम कामावर हजर राहिला. व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षण दिसताच त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर चाचणीत तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. मंगळवारी नोंदविलेल्या अमेरिकेतील काऊन्टी भागात दोन नव्या कोरोनाच्या स्ट्रेननंतर त्या व्यक्तीला संसर्ग झाल्याचे आढळून आले. ज्यानंतर शेकडो काउंटी रहिवाशांना क्वारंटाईन करण्यास भाग पाडले गेले.

दरम्यान, डग्लस काऊन्टीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या गुरूवारी असे वक्तव्य केले होते की, ‘नव्या कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनच्या प्रसारानंतर सात जणांचा मृत्यू झाला. तर ३०० हून अधिक लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.’ याबद्दल चिंता व्यक्त करताना ते असेही म्हणाले की, ‘या लोकांना कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतोय, याची आपण कल्पनाही करत नाही, फक्त आपण फक्त त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवू शकतो.’

काऊन्टीमध्ये आतापर्यंत १ हजारांहून अधिकांना संसर्ग

मिळालेल्या माहितीनुसार, काऊन्टीमध्ये सुरू झालेल्या महामारीनंतर आतापर्यंत ३७ जणांचा बळी गेला. तर साधारण १, ३१५ जणांना कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण झाल्याचे समोर आले. ही महामारी सुरू झाल्यापासून काऊन्टीमध्ये जवळजवळ एक-पंचमांश  लोकांचा मृत्यू या बाधित कर्मचाऱ्याला लागण झाल्यामुळे सांगितले जात आहे.


ब्रिटनमधील नव्या व्हायरसपासूनही मॉडर्नाची लस संरक्षण करेल, कंपनीचा विश्वास
First Published on: December 25, 2020 9:19 AM
Exit mobile version