घरदेश-विदेशब्रिटनमधील नव्या व्हायरसपासूनही मॉडर्नाची लस संरक्षण करेल, कंपनीचा विश्वास

ब्रिटनमधील नव्या व्हायरसपासूनही मॉडर्नाची लस संरक्षण करेल, कंपनीचा विश्वास

Subscribe

ब्रिटनला कोरोनाच्या दुसर्‍या मोठ्या लाटेचा सामना करावा लागतोय, असेही मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे

कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकाराने ब्रिटन सावरत नाही तोच त्याहून अधिक संसर्गजन्य आणखी एक कोरोना व्हायरस आढळून आला आहे. यामुळे ब्रिटन हादरलं आहे. मात्र या कोरोनाच्या नव्या व्हायरसपासून आपली लस संरक्षण करेल, असा विश्वास अमेरिकन बायोटेक कंपनी मॉडर्नाने व्यक्त केला आहे. यासंदर्भातील वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

मॉडर्ना आयएनसीने असे म्हटलं की, “ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या कोविड-१९ व्हायरसपासून आमची लस रोगप्रतिकारशक्ती वाढवेल अशी आम्हाला आशा आहे. कोरोनाच्या कोणत्याही नव्या व्हायरसशी लढण्याची क्षमता तपासण्याची वेगळी चाचणी करण्याचाही कंपनीचा विचार आहे. कोरोनाचा नवा व्हायरस आढळून आल्यानंतर इंग्लंडमध्ये कडक कोरोना प्रतिबंधक लावण्याचा विचार असल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटले होतं, त्यानंतर मॉडर्नाने यासंदर्भात भाष्य केल्याचे दिसतंय.

- Advertisement -

दरम्यान, मॉडर्ना कंपनीने असाही दावा केला की, “कोरोनाच्या साथीचा उद्रेक झाल्यापासून उद्भवलेल्या SARS-CoV-2 व्हायरसच्या पूर्वीच्या असंख्य प्रकारांविरूद्ध आम्ही प्राण्यांवर आणि मानवावर यापूर्वीच चाचणी केली आहे, या चाचणीमध्येही आमची लस तितकीच प्रभावी राहिली आहे.” यासह अमेरिकन मॉडर्नाने असेही स्पष्ट केले आहे, आमच्या अपेक्षापूर्तीसाठी येत्या आठवड्यांमध्ये आम्ही लसीच्या आणखी चाचण्या घेणार आहोत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनमध्ये कोरोनाचा अतिशय झपाट्याने फैलावणारा नवा प्रकार आढळून आल्यानंतर ब्रिटनमध्ये मोठे नुकसान झाले आहे. अशाच प्रकारे नवीन व्हायरस दक्षिण आफ्रिकेतही वेगाने पसरत आहे. कदाचित यामुळेच ब्रिटनला कोरोनाच्या दुसर्‍या मोठ्या लाटेचा सामना करावा लागतोय, असेही मत तज्ज्ञांनी व्यक्त केले असल्याचे सांगितले जात आहे.


एका आठवड्याच्या आत ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा दुसरा स्ट्रेन!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -