कोरोनामुळे ‘या’ महिन्यापर्यंत २ लाख रूग्णांचा बळी जाण्याची शक्यता!

कोरोनामुळे ‘या’ महिन्यापर्यंत २ लाख रूग्णांचा बळी जाण्याची शक्यता!

प्रातिनिधीक फोटो

जगभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे, परंतु यावेळी या महामारीचा सर्वाधिक वाईट परिणाम अमेरिकेवर होत आहे. कोरोनासमोर महासत्ता असलेला देश अमेरिका पूर्णपणे हतबल झाला आहे. येथे कोरोनाची प्रकरणे वाढत असून मृत्यूची संख्याही झपाट्याने वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते, लवकरच ही संख्या दोन लाखांपर्यंत पोहोण्याची शक्यता आहे.

हार्वर्ड ग्लोबल हेल्थ इन्स्टिट्यूटचे प्रमुख आशिष झा यांनी बुधवारी सीएनएन न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, कठोर उपाययोजना न केल्यास, कोरोनामधील मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. झा म्हणाले, “जरी आता येथे प्रकरणे वाढत नसले तरी सप्टेंबर महिन्यात २ लाख कोरोना रूग्णाचा बळी जाण्याची शक्यता आहे.”

ते म्हणाले, ‘सप्टेंबर महिन्यापर्यंत हे शक्य आहे, कारण सप्टेंबरपर्यंतही महामारी संपणार नाही. या बाबतीत मला खरंच चिंता आहे. येत्या आठवड्यात आणि महिन्यांत अमेरिका कोठे असेल याबद्दल मला खरोखर काळजी वाटते.’

आजतकने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संपूर्ण जगातील सर्वाधिक मृत्यू हे अमेरिकेत कोरोनामुळे झाले. ही संख्या १ लाख १२ हजार ७५४ पेक्षा जास्त होती. तसेच, अमेरिका हा एकमेव प्रमुख देश आहे की, ज्याने कोरोना नियंत्रणात नसताना लॉकडाऊन उघडले आहे. त्यामुळे या वस्तुस्थितीचे थेट संकेत आता समोर येत आहे. येथे, १४ दिवसांपासून आयसोलेशनमध्ये राहून कोरोना पॉझिटिव्ह लोकांची संख्या ५ टक्के किंवा त्यापेक्षा कमी असल्याचे ही झा यांनी सांगितले.

यासह होणारे मृत्यू हे स्वाभाविक नव्हते आणि कोरोना चाचणी, कॉन्टक्ट ट्रेसिंग, सोशल डिस्टेन्सिंग आणि मास्क घालून प्रतिबंधित केले जाऊ शकते. अमेरिकेच्या बर्‍याच राज्यांत अलिकडच्या काळात कोरोनाची झपाट्याने वाढ झाली आहे. झा यांच्यासह इतरही अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अमेरिकेत लवकरच लॉकडाऊनच्या निर्बंधांवर सुट दिली आहे. रॉयटर्सच्या विश्लेषणानुसार, ५ आठवड्यांच्या घटानंतर अमेरिकेत नवीन संक्रमणाच्या काही घटना राष्ट्रीय पातळीवर वाढल्या आहेत आणि सध्या एकूण २ लाख ३ हजार ३८ प्रकरणं आहेत.

COVID-Tracking Projectच्या मते, शुक्रवारी एका दिवसात जास्तीत जास्त म्हणजे ५ लाख ४५ हजार ६९० लोकांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती, परंतु वाढत्या रूग्णांनंतर पुन्हा कोरोना चाचणी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.


NEET आरक्षण प्रकरण: आरक्षण हा मूलभूत अधिकार नाही – सर्वोच्च न्यायालय
First Published on: June 11, 2020 6:46 PM
Exit mobile version