Ukraine Crisis: यूक्रेन संकटादरम्यान तैवानमध्ये हस्तक्षेप करू नका, नाहीतर…; अमेरिकेचा चीनला इशारा

Ukraine Crisis: यूक्रेन संकटादरम्यान तैवानमध्ये हस्तक्षेप करू नका, नाहीतर…; अमेरिकेचा चीनला इशारा

Ukraine Crisis: यूक्रेन संकटादरम्यान तैवानमध्ये हस्तक्षेप करू नका, नाहीतर...; अमेरिकेचा चीनला इशारा

सध्या रशिया आणि यूक्रेनमधला तणाव वाढताना दिसत आहे. रशिया यूक्रेनवर हल्ल्या करण्याची शक्यता वर्तवली आहे. कारण तशाच प्रकारे रशिया सध्या हालचाल करताना दिसत आहे. यादरम्यान अमेरिकेने चीनला इशारा दिला आहे. अमेरिकेने चीन सांगितले की, ‘यूक्रेनमध्ये सुरू असलेल्या संकटाचा फायदा घेऊन तैवानमधील हस्तक्षेप वाढवू नका.’ त्यामुळे अमेरिकेने चीनला आधीचा वेढा घातला आहे.

तैवानबाबत चीनचे हेतू फारसे चांगले नाहीत. त्यामुळे अमेरिका आणि इतर देश सतत चीनला इशारा देत आहेत. पण चीन काही मागे हटण्यास तयार असल्याचे दिसत नाही. अमेरिकेने दोन अण्वस्त्रधारी युद्धनौका तैनात केली आहेत. एक फिलिपिन्सच्या समुद्रात आणि दुसरी जपानच्या योकोसुकामध्ये तैनात करण्यात आली आहे. याच्या माध्यमातून चीनला कडक इशारा दिला आहे की, ‘तैवानपासून दूर राहा.’

चीनने अमेरिकेला दिले असे उत्तर…

दुसऱ्याबाजूला चीनने आपल्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (PLA) तैनातीच्या माध्यमातून अमेरिकेला उत्तर दिले आहे. पीएलएने रविवारी तैवानच्या दक्षिण पश्चिम एअर डिफेन्स झोन (ADIZ) मध्ये ३९ लढाऊ विमाने पाठवली आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात जे-१० आणि जे-१६ सारख्या लढाऊ विमानांचा समावेश आहे.

यादरम्यान तैवानच्या हवाई दलाने हवाई गस्त आणि जमिनीवरून हवेत हल्ला करणारे क्षेपणास्त्र यंत्रणा सक्रिय केल्या आहेत. जेणेकरून पीएलएचे कोणतेही आक्रमण रोखले जाऊ शकेल.

अमेरिका अशाप्रकारे यूक्रेनला करतेय मदत

युद्धाची शक्यता असल्यामुळे अमेरिकेने यूक्रेनला मदतीचा हात पुढे केला आहे. रशियाने मोठ्या प्रमाणात सीमेवर सैनिकांना तैनात केले आहे. यादरम्यान अमेरिकेन ९० टन प्राणघातक हत्याराची मदत पोहोचवली आहे. यापूर्वी अमेरिकेने यूक्रेनला सैन्य मदतीसाठी मंजूरी दिली होती. त्यानंतर पहिल्यांदा जे सैन्य पाठवण्यात आले, ते यूक्रेनमध्ये पोहोचले आहे. यामध्ये सीमेवर तैनात सैनिकांसाठी हत्यारांचा समावेश आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी डिसेंबर महिन्यात यूक्रेनला २० कोटी डॉलर म्हणजेच १ हजार ४४८ कोटी रुपयांचे सुरक्षा सहाय्यता पॅकेज मंजूर केले होते.


हेही वाचा – Ukraine Crisis: रशियाकडून यूक्रेनवर हल्ल्याची शक्यता, अमेरिकचे दूतावासातील कर्मचाऱ्यांना तातडीने देश सोडण्याचे आदेश


First Published on: January 24, 2022 11:58 AM
Exit mobile version