US Mass Shooting: अमेरिकेत पुन्हा गोळीबार, एका मुलीसह ८ जण जखमी

US Mass Shooting: अमेरिकेत पुन्हा गोळीबार, एका मुलीसह ८ जण जखमी

अमेरिकेत पुन्हा गोळीबार एका मुलीसह ८ जण जखमी

अमेरिका वॉशिंग्टन डीसीमध्ये शुक्रवारी रात्री गोळीबार झाला. या गोळीबारात एका मुलीसह आठ जण जखमी झाले आहेत. मात्र, दोनदा झालेल्या या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ( America Washington DC on Friday night Eight people including a girl have been injured in this firing )

असिस्टेंट चीफ ऑफ पेट्रोल सर्विसेस साउथ आंद्रे राइट म्हणाले की, पोलिसांनी लेबूम स्ट्रीटवरील गोळीबाराला तत्काळ प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात आठ जण जखमी झाले आहेत. सर्व लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वजण सुरक्षित आहेत.

पोलीसांडून काळ्या सेडान कारचा शोध सुरु

ते म्हणाले की अधिकारी लेबम स्ट्रीटवर असताना पोलिसांना दुसऱ्या रस्त्यावर गोळीबार झाल्याचा कॉल आला. येथे त्यांना 12 वर्षांची मुलगी आढळली, तिच्या पायात गोळी लागली होती. यानंतर मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस प्रत्यक्षदर्शींनी नमूद केलेल्या काळ्या सेडान कारचा शोध घेत आहेत. ही कार गोळीबार करणारे लोक चालवत होते. कारमध्ये बसलेल्या या शूटर्सनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला. मात्र, गोळीबारामागील हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.

( हेही वाचा: Poonch Terror Attack: ईद साजरी न करता ग्रामस्थांनी हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसाठी केली प्रार्थना )

गेल्या आठवड्यात एका वाढदिवसाच्या पार्टीत गोळीबार 

याआधी गेल्या आठवड्यात अलाबामामध्येही गोळीबाराची घटना समोर आली होती. यादरम्यान गोळी लागल्याने चार जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमीही झाले होते. वाढदिवसादरम्यान गोळीबाराची ही घटना घडल्याचे वृत्त आहे. यानंतर पोलिसांच्या तपासादरम्यान सीसीटीव्हीही स्कॅन करण्यात येत आहेत. गोळीबारामागचे कारण अद्याप पोलिसांना समजू शकलेले नाही.

( हेही वाचा: काँग्रेस नेते राहुल गांधी आज सरकारी बंगल्याची चावी लोकसभा सचिवालयाला सुपूर्द करणार )

एका खासगी शाळेतही गोळीबार

मार्च महिन्यात अमेरिकेतील एका खासगी शाळेत गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. यावेळी या गोळीबारात तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेतील तेनेसी प्रांतातील नॅशविल येथील एका खासगी काॅन्व्हेंट स्कूलमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. एका माथेफिरुने हा गोळीबार केल्याचं समोर आलं होतं.

First Published on: April 22, 2023 4:09 PM
Exit mobile version