घरदेश-विदेशPoonch Terror Attack: ईद साजरी न करता ग्रामस्थांनी हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसाठी केली प्रार्थना

Poonch Terror Attack: ईद साजरी न करता ग्रामस्थांनी हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसाठी केली प्रार्थना

Subscribe

ज्या भागात जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला त्या भागातील लोकांनी ईद साजरी केली नाही. केवळ नमाज अदा करून हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रार्थना करण्यात आली.

जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान हुतात्मा झाल्याने देशभरातील लोक दु:खी झाले आहेत. शनिवारी देशाच्या सर्व भागात ईद साजरी करण्यात आली, मात्र ज्या भागात जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला त्या भागातील लोकांनी ईद साजरी केली नाही. केवळ नमाज अदा करून हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रार्थना करण्यात आली.( Poonch Terror Attack Sangiot villagers pray for martyrs families without celebrating Eid )

हुतात्म्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ग्रामस्थ

या हल्ल्याचा सर्व ग्रामस्थांनी निषेध केल्याचे स‌ॅंगियोट गावच्या सरपंचांनी सांगितले. त्यामुळेच या दुःखाच्या काळात आपण ईद साजरी केली नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, सर्व गावकरी हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे आहोत. त्यांनी सांगितले की, हल्ल्यानंतर गावकरी घटनास्थळी पोहोचले होते आणि त्यांनी सुरक्षा दलांसह मदत आणि बचाव कार्य केले होते.

- Advertisement -

इफ्तार पार्टीसाठी जवान फळे आणि भाजीपाला घेण्यासाठी गेले होते

पूंछ-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास लष्कराच्या ४९ राष्ट्रीय रायफल्सचे (आरआर) लष्करी वाहन भिंबर गली येथून स‌ॅंगियोट गावातील लष्करी मुख्यालयाकडे रसद घेऊन जात होते. हा हल्ला झाला तेव्हा गाडीत भाजीपाला, फळे, अंडी आणि इफ्तार पार्टीसाठी लागणारे इतर साहित्य होते. हे जवान सकाळी मुख्यालयातून खाद्यपदार्थ घेण्यासाठी बिंबर गली येथे गेले होते.

( हेही वाचा: Kerala: राजीव गांधींप्रमाणेच तुम्हाला…, पंतप्रधान मोदींना सुसाईड बाॅम्ब हल्ल्याची धमकी )

- Advertisement -

दहशतवाद्यांचा राजोरीच्या जंगलात शोध सुरु

राजोरी आणि पूंछ सीमेला लागून असलेल्या भटादुरियान भागात दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर लष्कराने राजोरीतील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली आहे. लष्कराच्या जवानांनी बीजी आणि मांजकोटला लागून असलेल्या जंगल भागात कोम्बिंग सुरू केले आहे.

या हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांमध्ये चार जवान पंजाबचे आणि एक ओडिशाचा आहे. हल्लेखोरांची संख्या चार ते पाच असल्याचे सांगण्यात येत आहे. पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (PAFF) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -