दहशतवाद्यांचा अमरनाथ यात्रेवर हल्ल्याचा कट; अमरनाथ यात्रा स्थगित

दहशतवाद्यांचा अमरनाथ यात्रेवर हल्ल्याचा कट; अमरनाथ यात्रा स्थगित

दहशतवाद्यांचा अमरनाथ यात्रेवर हल्ल्याचा कट; अमरनाथ यात्रा रद्द

अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भक्तांवर हल्ला करण्याचा कट दहशतवाद्यांनी आखला होता. मात्र, या हल्ल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना माहित पडली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने शोध मोहिम सुरु केली. या शोध मोहिमेत अमरनाथ यात्रेच्या मार्गावर भुसुरुंग आणि स्निपर रायफल सापडली. त्यामुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. सध्या या भागात लष्कराचा ताफा वाढवण्यात आला आहे.

भुसुरुंग पाकिस्तानचा तर रायफल अमेरिकेची

भारतीय लष्कराचे वरिष्ठ अधिकरी लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लोन यांनी यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे. ते म्हणाले की, ‘गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली होती. या माहितीच्या पार्श्वभूमीवर आम्ही शोध मोहिम सुरु केली. यावेळी आम्हाला एक भुसुरंग सापडला. हा भुसुरुंग पाकिस्तानातील कारखान्यात निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर एम-२४ अमेरिकन स्निफर रायफल सापडली.’ या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर आणि पोलिसांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत ते बोलत होते. शांतता भंग करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत असल्याचे ढिल्लोर म्हणाले.

पर्यटक आणि यात्रेकरुंना ताबडतोब काश्मीर सोडण्याच्या सूचना

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मार सरकारने काश्मीरमधील पर्यटक आणि अमरनाथ यात्रेकरुंना काश्मीर सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

First Published on: August 2, 2019 5:31 PM
Exit mobile version