कर्नाटकात काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी लढाई, विकासासाठी भाजपच; अमित शाहांची टोलेबाजी

कर्नाटकात काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी लढाई, विकासासाठी भाजपच; अमित शाहांची टोलेबाजी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज कर्नाटक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कर्नाटकातील लोकांना संबोधित केलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवण्याचं आवाहन अमित शाह यांनी केलं. दरम्यान, याचवेळी कर्नाटकात काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी लढाई सुरू असल्याचं सांगत शाहांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

अमित शाह हे बेल्लरीच्या संदूरमधील भाजपाच्या विजय संकल्प समावेश कार्यक्रमाला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी कर्नाटक काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी सुरू असलेल्या अंतर्गत कलहाची खिल्ली उडवली. काँग्रेस आणि जेडी(एस) हे पक्ष भ्रष्टाचार आणि घराणेशाहीने बरबटलेले आहेत. असे पक्ष कर्नाटकच्या विकासासाठी कधीही काम करू शकत नाहीत. येथील लोकांना जर विकास हवा असेल, तर त्यांनी भाजपाला मतदान करावं, असं आवाहन अमित शाह यांनी केलं.

२०१९ मध्ये काँग्रेस आणि जेडी (एस) च्या युतीचं सरकार स्थापन झालं आणि भ्रष्टाचाराला सुरुवात झाली. काँग्रेस आणि जेडी (एस) हे घराणेशाहीकडून चालवले जाणारे पक्ष आहेत. कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री पदासाठी सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात अंतर्गत कलह सुरू आहे. इतरही बरेच नेते मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे कर्नाटकचा विकास होणार नाही. यासाठी मोदी हेच एकमेव पर्याय आहेत, असं अमित शाह म्हणाले.


हेही वाचा : दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल ‘मातोश्री’वर; उद्धव ठाकरेंशी ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा


 

First Published on: February 24, 2023 7:14 PM
Exit mobile version