अमृतसर रेल्वे दूर्घटना: मला All-Clear हिरवा सिग्नल मिळाला होता – मोटरमन

अमृतसर रेल्वे दूर्घटना: मला All-Clear हिरवा सिग्नल मिळाला होता – मोटरमन

अमृतसरमध्ये रेल्वे अपघात

शुक्रवारी रात्री पंजाबमधील अमृतसर येथे रेल्वे रुळाशेजारी रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रेल्वे अपघात झाला, या अपघातामध्ये ६१ जणांचा मृत्यू तर ७२ जण जखमी झाले. या प्रकरणी संबंधित ड्रायव्हरला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच त्याची कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान मोटरमनने सांगितले की, त्याला पूर्णपणे हिरवा सिग्नल मिळाला होता. त्यानंरच त्याने ट्रेन पुढे नेली. समोर रावण दहन पाहण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर लोक थांबलेले असतील याची त्याला कल्पनादेखील नव्हती.

फाटकावरील कर्मचाऱ्यांची चूक

रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितले की, रेल्वे जेव्हा अमृतसरच्या रेल्वे फाटकाजवळ पोहोचली, तेव्हा फाटकावर उभ्या असलेल्या कर्मचाऱ्याने नीट लक्ष ठेवायला हवे होते. त्यामुळे या दूर्घटनेत लाइनमनचा दोष असू शकतो. शेकडो नागरिक रुळावर थांबले होते. तरीही त्याने यासंदर्भातील माहिती मोटरमन किंवा त्यांच्या कार्यालयाला दिली नाही. रावण दहनाचा कार्यक्रम सुरू झाला होता. फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. त्यामुळे लोकांनादेखील ट्रेनचा आवाज आलाच नाही.

आयोजकही दोषी

या दूर्घटनेसंदर्भात रेल्वे प्रशासनाला जाब विचारला असता, प्रशासनाने सांगितले की, रेल्वे फाटकाशेजारी आयोजित रावण दहनाच्या कार्यक्रमाबाबत आपल्याला काहीच माहिती देण्यात आली नव्हती. तर दुसरीकडे, पंजाब आणि दिल्लीतील रेल्वे विभागांनी रेल्वे ट्रॅकजवळ रावण दहनाचा कार्यक्रम होत असल्याची आपल्याला कल्पनाही नव्हती असे बोलून हात झटकले आहेत.

वाचा – अमृतसर रेल्वे दुर्घटना; ६१ जणांचा मृत्यू ७२ जखमी

First Published on: October 20, 2018 3:02 PM
Exit mobile version