घरदेश-विदेशअमृतसर रेल्वे दुर्घटना; ६१ जणांचा मृत्यू ७२ जखमी

अमृतसर रेल्वे दुर्घटना; ६१ जणांचा मृत्यू ७२ जखमी

Subscribe

पंजाबमध्ये रावण दहनादरम्यान झालेल्या भीषण अपघातामध्ये ६१ जणांचा मृत्यू तर ७२ जण जखमी झाले आहेत. या दुर्देवी अपघातानंतर पंजाब सरकारने एक दिवसाचा राजकीय शोक जाहीर केला आहे. तर सर्व कार्यालय आणि शिक्षण संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत.

पंजाबच्या अमृतसहमध्ये रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान मोठी दुर्देवी घटना घडली. दोन भरधाव ट्रेनेने रेल्व रुळावर रावण दहनाचा कार्यक्रम पहात उभे राहिलेल्यांना चिरडले. अमृतसरच्या चौडा बाजारजवळच्या जोडा फाटकजवळ ही धक्कादायक घटना घडली असून या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत ६१ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर ७२ जण जखमी झाले आहेत. जखमींमधील ७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर अनेक राजकीय नेत्यांनी घटनास्थळावर भेट दिली तसंच जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. अमृतसर रेल्वे अपघातानंतर ८ रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तर ५ रेल्वेचा मार्ग बदलण्यात आला आहे.

- Advertisement -

अशी घडली घटना

अमृतसरच्या जौडा फाटक येथे शुक्रवारी दरवर्षीप्रमाणे दसऱ्यांच्या शुभमूहूर्तावर यंदाही रावण दहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली. रेल्वे ट्रॅकच्या शेजारीच हा कार्यक्रम असल्याने काही नागरिक रेल्वे ट्रॅकवर उभे राहून कार्यक्रम पाहत होते. रावणाचे दहन करण्यात आले त्यामुळे फटाके वाजू लागले आणि सर्व जण पळू लागले. फटक्यांच्या जोरदार आवाजामुळे आलेली रेल्वेचा आवाज आला नाही. अचानक भरधाव वेगात दोन रेल्वे आल्या आणि या मृत्यूच्या रेल्वेने १०० पेक्षा अधिक जणांना चिरडत नेले. ही ट्रेन जालंधरवरुन अमृतसरला जात होती. या दुर्देवी घटनेमध्ये ६१ जणांचा मृत्यू झाला. तर ७२ जण जखमी झाले आहेत. जखमींवर अमृतसरच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींमधील ७ जणांचा प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातातील मृतांमधील २० जणांची ओळख अद्याप पटलेली नाही.

- Advertisement -

एक दिवसाचा राजकीय शोक

या दुर्देवी घटनेनंतर पंजाब सरकारने एका दिवसाच्या राजकीय शोकाची घोषणा केली आहे. यासंदर्भात पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अरमिंदर सिंह यांनी ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी एका दिवसाचा राजकीय शोक आणि सर्व कार्यालय आणि शिक्षण संस्था बंद राहणार असल्याचे सांगितले आहे. तसंच याप्रकरणाचा तपास केला जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. आज मुख्यमंत्री घटनास्थळाला भेट देणार असून जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेणार आहेत. पंजाब सरकारकडून अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे. तर जखमींवर उपचार मोफत केले जाणार आहेत.

केंद्राकडून २ लाखांची मदत जाहीर

राष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी या भीषण दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ मदतीचे निर्देश दिले आहेत. तर अपघातामधील मृतांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून २ लाखांची तर जखमींना ५० लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

कार्यक्रमाची रेल्वे प्रशासनाला माहिती नाही

अमृतसर रेल्वे अपघातावर पंजाब रेल्वेमंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले आहे की, प्रशासनाकडून मदत करण्याचे काम सुरु आहे. ही वेळ राजकारण करण्याची नाही. रेल्वे प्रशासनाला या कार्यक्रमाबद्दल काहीच माहिती देण्यात आली नव्हती. या कार्यक्रमाला रेल्वेकडून परवानगी दिली गेली नव्हती.

लोकांनी सतर्क राहणे गरजेचे होते

रेल्वे बोर्डाचे चेअरमन अश्वनी लोहानी यांनी सांगितले की, या अपघाताला रेल्वेला जबाबदार ठरवणे चूकीचे ठरेल. त्याठिकाणी दोन मेन लेवलच्या क्रॉसिंग होत्या आणि त्या दोन्ही पण बंद होत्या. दोन्ही सुध्दा मेन लाईन असल्यामुळे इथे स्पीडचे काहीच बंधन नसते. मेन लाईनजवळ दसरा उत्सवाचे आयोजन केले जाणार आहे याची रेल्वे प्रशासनाला माहिती नव्हती. रेल्वे ट्रॅकवर उभे राहून लोकं रावण दहनाचा कार्यक्रम पाहत होते. याठिकाणावरुन रेल्वे जातात हे सर्वांना माहिती होते. त्यामुळे लोकांनी सतर्क राहून रेल्वे ट्रॅकवर जायचे नव्हते.

याप्रकरणाची चौकशी होणार

पंजाबचे राज्यपाल वी पी सिंह बदनौर यांनी याप्रकरणावर दु:ख व्यक्त केले आहे. याप्रकरणाचा चौकशी केली जाणार तसंच दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यपालांनी घटनास्थळावर भेट देत रुग्णालयात जाऊन जखमी आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसंच लवकरात लवकर मदतीचे आश्वासन दिले.

अपघात जाणीवपूर्वक घडवून आणलेला नाही

पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी देखील घटनास्थळावर भेट दिली. तसंच अमृतसरच्या गुरु नानक देव रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली आणि त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली. रावण दहनाच्या कार्यक्रमा दरम्यान घडलेली घटना दुर्देवी असून हा अपघात होता हे सर्वप्रथम आपल्याला समजून घेतले पाहिजे. निश्चित दुर्लक्ष झाले पण हे कोणी जाणीवपूर्वक हेतू किंवा उद्देशाने घडवून आणलेले नाही असे नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले. रेल्वे खूप वेगात होती आणि अवघ्या काही मिनिटात हा अपघात घडला. रेल्वेकडून हॉर्न देण्यात आला नाही. मुख्यमंत्र्यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत असे नवज्योतसिंग सिद्धू यांनी सांगितले आहे.

रावणाची भूमिका करणाऱ्याचा मृत्यू

दसऱ्यानिमित्त आयोजित केलेल्या रामलीला कार्यक्रमात रावणाची भूमिका साकारणाऱ्या दलबीर सिंह यांचा देखील या अपघातामध्ये दुर्देवी मृत्यू झाला आहे. दलबीर यांच्या पाश्चात त्यांची पत्नी, आठ महिन्याची मुलगी आणि आई असा परिवार आहे. दलबीर यांच्या जाण्याने यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दलबीर घरातील कर्ता व्यक्ती होता त्याच्या जाण्याने कुटुंबाचा आधार गेला आहे. दलबीर यांच्या पत्नीला सरकारी नौकली दिली जावी अशी मागणी दलबीर यांच्या आईने सरकारकडे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -