धक्कादायक! भारत आहे नपुसकांची राजधानी!

धक्कादायक! भारत आहे नपुसकांची राजधानी!

फायजर अपजॉनने एक सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणातून भारत ही जगाची नपुंसकत्वाची राजधानी आहे असं अभ्यासातून उघड झालं आहे. भारताची लोकसंख्या आणि जीवशैलीशी ही या मागची मुख्य कारणं असल्याचं म्हटलं जात आहे. शारीरीक संबंध ठेवताना येणाऱ्या अडचणींवर उपचार असतानाही अनेकदा पुरूष त्यासाठी नकार देतात. याच पार्श्वभूमीवर इरेक्टाइल डिसफंक्शन (ईडी) बाबत लोकांना असलेली माहिती, त्यावरील उपचार आणि या उपचारांवर प्रभाव टाकणारे घटक यासंदर्भात फायजर अपजॉनने एक सर्वेक्षण केले.

सर्वेक्षणात स्त्री-पुरूषांचा सहभाग

या सर्वेक्षणात १०४१ पुरूष व महिला आणि ३०७ युरॉलॉजिस्ट्स, अँड्रॉलॉजिस्ट्स, सेक्सॉलॉजिस्ट्स आणि कन्सल्टिंग फिजिशिअन यांनी सहभाग घेतला होता. त्याचबरोबर आणखी एका अभ्यासातून समोर आलं की ४० वर्षांखालील ३० टक्के पुरुषांना आणि सर्व वयोगटातील २० टक्के पुरुषांना गुप्तांगासंबंधी समस्या भेडसावते. ८२ टक्के महिलांनी आपण मैत्रिणींशी चर्चा करणं किवा घरगुती उपचार करण्याचा सल्ला देण्यापेक्षा साथीदाराला डॉक्टरकडे जाऊन उपचार करण्याचा सल्ला देऊ असं सांगितलं आहे.

भारतात दुर्दैवाने लैंगिक समस्यांवर मोकळेपणाने बोललं जात नाही. पण महिला आता आपल्या समस्यांवर हळूहळू का होईना पण बोलू लागल्या आहेत. एखाद्या पुरुषाने योग्य उपचार घेण्यासाठी महिलेची भूमिका किती महत्त्वाची आहे हे सर्वेक्षणातून ठळकपणे समोर आलं आहे.

१. ५३ टक्के पुरूष याबाबतीत अनभिज्ञ असून ७८ टक्के महिलांना याबबात माहिती आहे.

२. ३५ टक्के पुरूष आणि ४७ टक्के महिलांना ईडीसाठी तणाव हा सर्वाधिक कारणीभूत घटक आहे असे वाटते

३. ७५ टक्के पुरूष आणि ६६ टक्के महिलांना ईडी ही म्हातारपणीची समस्या आहे, असे वाटत नाही

४.  ५६ टक्के पुरुष नातेसंबंधावर परिणाम होऊ नये, यासाठी ईडीच्या समस्येबाबत आपल्या साथीदाराशी चर्चा करण्यास तयार आहेत.

५.   २८ टक्के महिला आपल्या साथीदाराने ईडीच्या समस्येच्या निवारणासाठी काही उपाययोजना न केल्यास वेगळे होण्याचा विचार करतात.

उपचारांसाठी तयार

१.    ८२ टक्के महिलांना डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य वाटते

२    ६१ टक्के पुरुष डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधे घेण्यास तयार

३     ४२ टक्के पुरुष  फार्मसिस्टने सांगितलेली औषधे घेण्यास तयार आहेत

नातेसंबंध

१. २१ टक्के महिलांना आपला साथीदार शारीरिक समाधान देतो की नाही, याबाबत खात्री नाही

२  ७० टक्के पुरुषांना आपण आपल्या साथीदाराला लैंगिक समाधान देऊ शकतो असे वाटते

३  ८७ टक्के पुरुषांना नातेसंबंधांत लैंगिक सलगी अत्यंत महत्त्वाची आहे असे वाटते


हे ही वाचा – भयंकर! कोरोनाग्रस्ताचा मृतदेह रस्त्यात टाकून रूग्णवाहिका निघून गेली!


 

First Published on: July 9, 2020 6:53 PM
Exit mobile version