आत्महत्येसाठी ट्रॅकवर झोपला तरूण; ट्रेनमधून उडी मारून चालकाने वाचवला जीव!

आत्महत्येसाठी ट्रॅकवर झोपला तरूण; ट्रेनमधून उडी मारून चालकाने वाचवला जीव!

प्रातिनिधीक फोटो

आंध्र प्रदेशच्या विजयनगरममध्ये एका रेल्वे चालकाने आपल्या बुद्धिमत्ता आणि तत्परतेने आत्महत्या करणाऱ्या एका तरूणाचा जीव वाचविला असल्याचा प्रकार समोर आला आहे. ट्रेनच्या चालकाने आपत्कालीन ब्रेकचा वापर वेळेवर केल्याने एका तरूणाचा जीव जाता-जाता बचावला असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही घटना विजयनगरमच्या कोरुकोंडा येथील आहे. येथे एक रेल्वेचालक रिकाम्या रेल्वे घेऊन विशाखापट्टणमकडून विजयनगरमच्या दिशेने जात होता. यावेळी ट्रेन लांब असतानाच रेल्वे चालकाला रेल्वे ट्रकवर तरूण झोपलेल्या आवस्थेत आत्महत्या करताना दिसला. ट्रेन आणि ट्रॅकवर झोपलेल्या तरूणामध्ये फारसे अंतर नसताना सतर्कता दाखवत त्याने या तरूणाचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, रेल्वे चालकाने सतत हॉर्न वाजवून या तरूणाला इशारा देण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्याचा कोणताही परिणाम तरूणावर झाला नाही. यावेळी ट्रेनही वेगात असताना कोणताही विचार न करता चालकाने जीवाची पर्वा न करता आपत्कालीन ब्रेक रेल्वेला लावला. वेगवान असलेल्या ट्रेनला आपत्कालीन मारलेल्या ब्रेकमुळे जोरदार धक्का बसला आणि वेगात असलेली ट्रेन या तरूणाच्या पुढे काही अंतरावर येऊन थांबली. यावेळी ट्रेनचा वेग कमी झाल्यावर चालकाने चालू ट्रेनमधून उडी मारली आणि त्या तरूणाचा जीव वाचवला.

रेल्वे चालकाने घटनेची माहिती जवळच्या स्टेशन मास्टर व रेल्वे अधिकाऱ्यांना दिली आणि आत्महत्या करणाऱ्या तरुणाला त्यांच्या स्वाधीन केले. स्टेशन मास्टरने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने ट्रॅकवर आपला जीव संपविणाऱ्या तरूणाशी बातचीत केली आणि त्याला समजावले.  रेल्वे अधिका्यांनी या तरूणाला त्याच्या कुटूंबियांकडे सुपूर्द केले आहे. स्थानिक पोलिसही या प्रकरणाचा तपास करत असल्याचे सांगण्यात येत आहे.


जिवंत कुत्र्याला दोरीने बांधून मोटरसायकवरून नेले फरफटत; गुन्हा दाखल
First Published on: June 7, 2020 12:14 PM
Exit mobile version