घरमहाराष्ट्रजिवंत कुत्र्याला दोरीने बांधून मोटरसायकवरून नेले फरफटत; गुन्हा दाखल

जिवंत कुत्र्याला दोरीने बांधून मोटरसायकवरून नेले फरफटत; गुन्हा दाखल

Subscribe

मुक्या जनावराशी निर्दयीपणे वागणाऱ्या माणसाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल

केरळमध्ये गर्भवती हत्तीणीला खाण्यासाठी अननसामधून स्फोटक देऊन मारल्याची घटना ताजी असतानाच औरंगाबादमध्ये देखील जिवंत कुत्र्याला दोरीला बांधून मोटरसायकवरून फरफटत नेल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर कुत्र्याला फरपटत नेणार्‍या दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.

असा घडला प्रकार

मुक्या जनावराशी निर्दयीपणे वागणाऱ्या माणसाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका दुचाकीवरून दोघेजण कुत्र्याच्या गळ्याभोवती दोरी बांधून फरपटत घेऊन जात असल्याचे दिसत आहे. जिवंत मुक्या जनावराला अत्यंत क्रूरपणे ही व्यक्ती फरफटत नेत असल्याचा हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे.

- Advertisement -

या प्रकाराची शहानिशा करून गुन्हा दाखल

या घडलेल्या घटनेची माहिती मिळताच तसेच ॲनिमल पेयर्स आणि पीपल फॉर ॲनिमल या श्वान प्रेमी संघटनेच्या लोकांनी ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी ही घटना औरंगाबादेतीलच आहे का याची खात्री केली, त्यानंतर शहरातील क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करून गुन्हा दाखल केला असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ शहरातील अजबनगरमधील असल्याची माहिती क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली आहे. आरटीओच्या सहाय्याने दुचाकीच्या मालकाचा शोध घेतला जात आहे.

- Advertisement -

श्वान प्रेमींनी सदरील व्हिडिओ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ट्विट केला असून आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांना या घटनेची माहिती दिली. पालकमंत्री सुभाष देसाई यांनीही पोलीस महासंचालकांना तात्काळ या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत.


मुंबईत गॅस गळती नाही; अग्निशमन दलाने केली खात्री
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -