संतापजनक! चोरीच्या संशयावरून महिलांना निर्वस्त्र करून काढली धिंड, व्हिडिओ केला व्हायरल

संतापजनक! चोरीच्या संशयावरून महिलांना निर्वस्त्र करून काढली धिंड, व्हिडिओ केला व्हायरल

संतापजनक! चोरीच्या संशयावरून महिलांना निर्वस्त्र करून काढली धिंड, व्हिडिओ केला व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये होणाऱ्या क्रूर कृत्याचे सत्र काही थांबताना दिसत नाही आहे. तीन, चार दिवसांपूर्वी एका श्रीलंकन मॅनेजरला जाळल्याची घटना पाकिस्तानमधून समोर आली होती. त्यानंतर आता पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामधील लोकांच्या गर्दीने दुकानातून चोरी केल्याच्या आरोप लावून एका तरुणीसह ४ महिलांचे कपडे काढून त्यांना भररस्त्यात मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. सोमवारी लाहोरच्या जवळपास १८० किलोमीटर दूर असलेल्या फैसलाबादमध्ये ही घटना घडली. सोशल मीडियावर या संतापजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये एका तरुणीसह ४ महिला आपल्या बाजूला असलेल्या लोकांना विनंती करताना दिसल्या. त्यांचे शरीर झाकण्यासाठी त्या विनंती करत होत्या. मात्र त्यांना लाठ्या-काठ्यांनी अमानुष मारहाण केली जात होती. महिला रडत रडत त्यांना सोडण्याची विनंती करत होत्या, मात्र कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

माहितीनुसार, या महिलांची एक तास रस्त्यावर निर्वस्त्र परेड काढली. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पंजाब पोलीस अॅक्शन मोडमध्ये आली. पंजाब पोलिसांच्या एका प्रवक्त्याने मंगळवारी ट्वीटमध्ये म्हटले की, या दुर्दैव घटनेप्रकरणी आम्ही ५ जणांना अटक केली आहे. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत आणि यात सामिल असलेल्या सर्व आरोपींविरोधात न्यायालयात हजर केले जाईल. कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार ५ संशयित आणि इतर अनेकांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलांनी सांगितले की, फैसलाबादमधील बावा चक बाजारात त्या कचरा उचलण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना तहान लागली होती म्हणून उस्मान इलेक्ट्रिन स्टोरच्या आतमध्ये गेल्या आणि पाण्याची बॉटल मागितली. परंतु या दुकानाच्या मालकाने त्याच्यावर चोरी करण्याच्या हेतूने दुकानात घुसल्याचा आरोप केला. त्यानंतर दुकानाच्या मालकासह इतर लोकांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मग निर्वस्त्र करून त्यांना फरफटत नेले आणि मारहाण केली. त्यानंतर त्यांचा निर्वस्त्र असताना व्हिडिओ काढला. कोणीही त्यांच्या मदतीला गेले नाही.


हेही वाचा – आम्ही काही भारत नाही, श्रीलंकन मॅनेजरला जिवंत जाळल्याच्या प्रकारावर पाकिस्तानी मंत्र्याचे वादग्रस्त विधान


 

First Published on: December 8, 2021 12:10 PM
Exit mobile version