Video: जले पे नमक; मनोज तिवारींच्याच गाण्यावर आपचा जल्लोष

Video: जले पे नमक; मनोज तिवारींच्याच गाण्यावर आपचा जल्लोष

जले पे नमक; मनोज तिवारींच्याच गाण्यावर आपचा जल्लोष

दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीने बाजी मारली असल्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या निवडणुकीत केंद्रात सत्तेत असलेली भाजप आणि दिल्लीचा कारभार पाहणाऱ्या आम आदमी पक्षातची खरी लढत पाहायला मिळाली. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच आप आघाडीवर होती आणि ती आघाडी कायम ठेवली आहे. आठ तासांच्यानंतर आप ६३ जागांवर आघाडीवर असून भाजप सात जागांवर आघाडीवर आहे. या निकालामुळे आपचे कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला आहे. आपच्या कार्यकर्त्यांनी जले पे नमक छिडकना या म्हणीनुसार भाजपचे नेते मनोज तिवारी यांच्या चित्रपटांच्या ‘रिंकिया के पापा’ या गाण्यांवर थिरकले आहेत.

८ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेच्या ७० जागांवर मतदान करण्यात आलं होत. त्यांचाच आज निकाल जाहीर झाला आहे. बहुमतासाठी लागणार ३६ जागांचा आकडा आपने सहज पार केला आहे. मात्र भाजप हा आकडा पार करू शकली नाही आहे. तसंच काँग्रेसला अजूनही एकही जागा मिळवण्यात यश आलेलं नाही. याच सर्व पार्श्वभूमीवर आपचे कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करत आहेत.

काय म्हणाले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल? 

दिल्ली नागरिकांनी आश्चर्यचा धक्का दिला. आय लव्ह यू दिल्लीकरांनो. तिसऱ्यांदा तुम्ही आपल्या मुलांवर विश्वास दाखवला. हा विजय दिल्लीकरांचा आहे. ज्यांनी मुलगा म्हणून मला मत दिले आहे हा त्यांचा विजय आहे. ज्यांना २४ तास घरात वीज मिळतं आहे हा त्यांचा विजय आहे. ज्यांना चांगलं शिक्षण मिळतं आहे हा त्यांचा विजय आहे. दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये ज्यांना चांगले उपचार मिळाले आहेत हा त्यांचा विजय आहे, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.


हेही वाचा – दिल्ली निकालांनंतर चंद्रकांत पाटलांचं शिवसेनेला जाहीर आव्हान!


 

First Published on: February 11, 2020 6:12 PM
Exit mobile version