ट्विटर युजर्ससाठी वाईट बातमी, ‘या’ तारखेपासून हटवणार ‘ब्लू टिक’

ट्विटर युजर्ससाठी वाईट बातमी, ‘या’ तारखेपासून हटवणार ‘ब्लू टिक’

मायक्रो नेटवर्किंग साइट ट्विटरने आपल्या यूजर्सना मोठा धक्का दिला आहे. ट्विटरने गुरुवारी ‘ब्लू टिक’ फीचर काढून टाकण्यात येणार असल्यीच घोषणा केली आहे. ट्विटरने ही घोषणा अशा युजर्ससाठी केली आहे जे फ्री ब्लू टिक सुविधेचा लाभ घेत होते. कंपनीकडून सांगण्यात आले की, ते लवकरच इंडीव्हिज्यूअल यूजर्स ब्लू टिक काढून टाकणार आहे. एवढंच नाही तर कंपनीने यासाठीची तारीखही जाहीर केली आहे.

येत्या १ एप्रिलपासून युजर्सच्या अकाउंटवरून ब्लू टिक काढण्यास सुरुवात होणार असल्याचं ट्विटरकडून जाहीर करण्यात आलंय. याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होणार आहे. कारण कंपनीने व्हेरिफाईड अकाउंट्ससाठी जगभरात सबस्क्रिप्शन मॉडेल सुरू केले आहे. एवढेच नाही तर कंपनी ब्लू व्हेरिफिकेशन मार्क काढू शकते. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये कंपनीने म्हटले आहे की, येत्या १ एप्रिलपासून ट्विटर जगभरात LegacyBlue आणण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे.

सर्व लेगसी व्हेरिफीकेशन अकाउंटवरून ब्लू टिक काढून टाकले जातील, पण फ्री ब्लू टिक असलेल्यांनी ट्विटर ब्लू टिक सेवेसाठी पैसे भरल्यास त्यांची ब्लू टिक टिकवून ठेवली जाईल, परंतु लीगली वेरिफाइडचा टॅग काढून टाकला जाईल.

ट्विटरचे मालक बनल्यानंतर एलोन मस्कने ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शन सुरू केले होते ज्याला शुल्क आकारले जात होते. ट्विटर ब्लू टिकची सेवा घेणाऱ्या युजर्सना लांबलचक पोस्ट टाकण्याची सुविधा मिळते. याशिवाय ब्लू टिकमध्ये ट्विट एडिट करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.

आता एलॉन मस्क फ्री ब्लू टिकची सेवा काढणार आहे. भारतातील ट्विटर ब्लूच्या मोबाईल प्लॅनसाठी युजर्सना ९०० रुपये द्यावे लागतील, तर वेब व्हर्जनसाठी ६५० रुपये शुल्क द्यावे लागेल. दरम्यान, एलोन मस्कने अलीकडेच फ्री अकाउंटवरून एसएमएस आधारित टू फॅक्टर ऑथेंटिकेशन फीचर काढून टाकले आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या ट्विटर अकाऊंटसाठी ब्लू टिक हवी असेल, तर आता तुम्हाला दरमहा किमान ६५० रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुमच्या अकाउंटची ब्लू टिक काढून टाकली जाईल.

लेगसी ब्लू चेक म्हणजे काय?
Twitter चा लेगसी ब्लू चेक हे कंपनीचे सर्वात जुने व्हेरिफीकेशन मॉडेल आहे. या अंतर्गत सरकार, कंपन्या, ब्रँड आणि संस्था, वृत्तसंस्था आणि पत्रकार, मनोरंजन, क्रीडा आणि गेमिंग, कार्यकर्ते, आयोजक आणि इतर प्रभावशाली व्यक्तींचे अकाउंट व्हेरिफाय करण्यात येत होते.

First Published on: March 24, 2023 6:08 PM
Exit mobile version