AR Rahman म्हणतो धर्मांतरासाठी बळजबरी नाही

AR Rahman म्हणतो धर्मांतरासाठी बळजबरी नाही

सुप्रसिद्ध संगितकार ए.आर.रहमान

बॉलिवूडमध्ये गीतकार आणि संगीतकारांची काही कमी नाही. याउलट येथे एकापेक्षा एक गायक आहेत ज्यांच्या संगीताने मंत्रमुग्ध होऊन जातो. त्यातीलच एक ज्यांचा आवाज हृदयाला जाऊन भिडतो, असे सुप्रसिद्ध संगितकार ए.आर.रहमान यांचा आज वाढदिवस आहे. ६ जानेवारी १९६६ मध्ये तामिळनाडू येथील एका कुटुंबात त्यांचा जन्म झाला. ए. आर. रहमान यांचे मूळ नाव ए. एस. दिलीप कुमार आहे. पण, त्यांचे हे मूळ नाव कोणालाही माहिती नसेल. मग, दिलीप कुमारचा रहमान कसा झाला?, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

रहमानवर यांची संगीत क्षेत्रातील कारकीर्द मोठी असली तरीही त्यांचे धर्मांतर हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. अनेकदा धर्मांतरासाठी कुणी त्यांच्यावर दबाव टाकला होता का? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. त्यावर ए.आर.रहमान म्हणाले की, धर्मांतरासाठी कोणतीही बळजबरी नाही. धर्मांतर तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुमचा आंतरआत्मा तुम्हाला आवाज देतो.

धर्मांतरासाठी दबाव नाही

ए.आर.रहमान म्हणतात की, धर्मांतरासाठी माझ्यावर कोणताही दबाव नाही. महत्त्वाचे म्हणजे आपली आई हिंदू होती. आई आध्यात्मिक आणि देवावर नितांत श्रद्धा ठेवणारी होती. म्हणूनच घरात हिंदू देव-देवतांचे फोटो, मूर्ती असते. त्याबरोबर मदर मेरी आणि जीजसचेही फोटो घरात होते. आमच्या घरी भिंतींवर मक्का आणि मदीनाचेही फोटो होते, असे रहमान सांगतो.

यासाठी घेतला निर्णय

‘मला समजलं की पुढे जाण्यासाठी एक मार्ग निवडायला लागेल आणि तो म्हणजे सुफीवादाचा मार्ग. संगीत त्याच्या नसा नसात होत आणि यासाठी त्यांनी सूफी इस्लम धर्म स्विकारण्याचा निर्णय घेतला. एकदा रहमान ज्योतिषीकडे गेले असता त्यांना ज्योतिषीने सांगितले की, तू तुझं नाव अब्दुल रहमान किंवा अब्दुल रहीम ठेव. रहमान यांच्या आईला वाटत होतं की त्याच्या नावात अल्लाह रक्खा असाव. त्यावेळी त्यांना रहमान हे नाव आवडलं आणि मग त्यांनी त्यांचे नाव ए.आर.रहमान केले आणि हे नाव आता संपूर्ण लोकप्रिय झाले.


हेही वाचा – बर्ड फ्ल्यूचा धोका वाढला, दिल्लीत उभारली कंट्रोल रुम


 

First Published on: January 6, 2021 4:55 PM
Exit mobile version