नवीन GB WhatsApp वापरत आहात ?

नवीन GB WhatsApp वापरत आहात ?

युजर्ससाठी वॉट्स एपच्या नवनवीन फीचर्समध्ये दररोज नव्या सुविधांची भर पडत असते. पण वॉट्स एप वापरताना GB WhatsApp चे व्हर्जन सध्या खूपच लोकप्रिय ठरत असल्याचे समोर आले आहे. वॉट्स एप अपडेट म्हणून हे व्हर्जन गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे खरे, पण हे वॉट्स एपचे अपडेटेड व्हर्जन नसून एक वेगळेच एप आहे. महत्वाचे म्हणजे हे एप वापरताना तुमच मूळ वापरातले वॉट्स एप अकाऊंटही ब्लॉक होऊ शकते. त्यामुळेच वॉट्स एपचे हे व्हर्जन वापरताना तुम्हाला अधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कारण या नव्या व्हर्जनमुळे तुमचे नुकसान होण्याचीही शक्यता आहे.

काय आहे नेमके GB WhatsApp ?

GB WhatsApp हे एक क्लोन एप आहे. वॉट्स एपचे हे फोर्क्ड व्हर्जन आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर थर्ड पार्टी डेव्हलपर्ससाठी हे GB WhatsApp एप एक प्रकारचे आपल्या सोईचे कस्टमाईज एप तयार करण्याची संधी देते. सध्याच्या वॉट्स एपच्या वापरासारखेच फीचर्स हे या क्लोन मॅसेजिंग एपच्या माध्यमातून उपलब्ध होतात. या क्लोन एपमधूनही मॅसेज आणि व्हिडिओ कॉलिंगच्या फीचर्सचा वापर करणे शक्य आहे. महत्वाचे म्हणजे आपल्या वापरानुसार हे क्लोन एप कस्टमाईज करणे शक्य आहे. या एपमध्ये युजर्सना अतिरिक्त फीचर्सही उपलब्ध होतात. त्यामुळे वॉट्स एपचा वापर अधिक सुलभ होतो. पण काही फीचर्समुळे युजर्स अडचणीतही येऊ शकतात. कारण या एपचा वापर तुम्हाला नुकसानही पोहचवू शकतो.

कसे डाऊनलोड कराल ?

GB WhatsApp आपल्या स्मार्टफोनमध्ये डाऊलोड करा
More Option वर क्लिक करा
Foud Modes हा पर्याय क्लिक करा
Update टॅब क्लिक करून, चेक अपडेट पर्याय क्लिक करा
Web Downloads पर्याय सिलेक्ट करा
GB WhatsApp तुमच्या स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड झालेला असेल

काय आहे एपचे तोटे ?

GB WhatsApp या वॉट्स एपच्या वापरामुळे तुमच्या वैयक्तिक डेटाची चोरी होण्याची शक्यता आहे. तसेच या एपचा वापर केल्याने तुमचे ओरिजिनल अकाऊंटही ब्लॉक होण्याची शक्यता आहे. GB WhatsApp हे एप सध्या गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही. पण ऑफिशिअल वेबसाईट किंवा ऑनलाईन पोर्टवरून Apk फाईलच्या माध्यमातून हे फीचर डाऊनलोड करता येणे शक्य आहे. त्यामुळेच वैयक्तिक डेटा लिक होण्याच्या शक्यतेमुळे हे एप न वापरणेच योग्य आहे.


 

First Published on: June 29, 2021 1:55 PM
Exit mobile version