अरुणाचल प्रदेशच्या बेपत्ता झालेल्या ‘त्या’ तरूणांना चीन आज भारताकडे सोपवणार!

अरुणाचल प्रदेशच्या बेपत्ता झालेल्या ‘त्या’ तरूणांना चीन आज भारताकडे सोपवणार!

प्रातिनिधीक फोटो

अरूणाचल प्रदेश येथून बेपत्ता झालेले पाच भारतीय तरूण त्यांच्या हद्दीत आढळले असून या पाच तरूणांना चीन आज भारताकडे सोपवणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या तरूणांना चीनची पीपल्स लिबरेशन हे आर्मीच्या भारतीय लष्कराडे सोपवणार आहे. या संदर्भात केंद्रीयमंत्री किरेन रिजीजू यांनी ट्वटिद्वारे माहिती दिली आहे.

चीनने या वृत्ताला दुजोरा देत, स. तसेच, रिजाजू यांनी देखील या अगोदर माहिती दिली होती की, चिनी ‘पीएलए’ (पीपल्स लिबरेशन आर्मी) ने भारतीय सेनेकडून हॉटलाइनवर पाठवण्यात आलेल्या संदेशाला उत्तर दिले आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, बेपत्ता तरूण त्यांच्या भागात आढळले आहेत. आता या तरूणांना भारताकडे सोपवण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.

भारत-चीन दरम्यान सीमेवर संघर्ष तीव्र असताना ही घटना झाली आहे. तर चीनमध्ये आढळलेल्या पाच तरूणांची नावं टोक सिंगकाम, प्रसात रिंगलिंग, डोंगटू एबिया, तानू बाकेर, नगारू दिरी अशी आहेत. या पाच तरूणांबाबत विचारणा केली असता चीनकडू सुरूवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली गेली होती. तुम्ही जे सांगता आहात त्यातले मला काही माहिती नाही, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी या तरुणांच्या अपहरणाबाबत सांगितले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशचे काँग्रेसचे आमदार निनॉन्ग एरिंग यांनी मागील काही दिवसात असा दावा केला होता की, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागातून पाच भारतीयांचे कथितरित्या अपहरण केले आहे. एरिंग यांनी पीएमओला टॅग करत आपल्या ट्विटमध्ये दावाही केला होता, अरुणाचल प्रदेशच्या सुबनसिरी जिल्ह्यातील पाच जणांचे अपहरण करण्यात आले आहे. त्यांनी भारत सरकारकडे तात्काळ कारवाईची मागणी देखील केली होती.


Corona Update: चिंताजनक! देशात सलग तिसर्‍या दिवशी कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक नोंद

First Published on: September 12, 2020 11:03 AM
Exit mobile version