आमच्यावरील आरोप खोटे, मी भ्रष्ट असेल तर.., समन्स बजावल्यानंतर केजरीवालांची पंतप्रधानांवर टीका

आमच्यावरील आरोप खोटे, मी भ्रष्ट असेल तर.., समन्स बजावल्यानंतर केजरीवालांची पंतप्रधानांवर टीका

दिल्लीच्या मद्य धोरणातील घोटाळ्याप्रकरणाचा तपास मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत पोहोचला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक झाल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सीबीआयने या प्रकरणी आम आदमी पार्टीचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. अरविंद केजरीवाल यांना १६ एप्रिल रोजी चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. यावेळी केजरीवालांनी पत्रकार परिषद घेत पीएम मोदींवर जोरदार टीका केली.

दारु घोटाळा झाल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. सर्व कामं सोडून सर्व यंत्रणा तपासात गुंतल्या आहेत. पण तपासात काय आढळले?, ईडी आणि सीबीआयचा आरोप आहे की, मनीष सिसोदिया यांनी १४ फोन तोडले आहेत. तर ईडीच्या कागदपत्रात १४ फोनचे ३ आयएमईआय नंबर लिहिले आहेत, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. ईडी सीझर मेमोनुसार, ४ फोन ईडीकडे आहेत आणि १ फोन सीबीआयकडे आहे. उर्वरित ९ फोन कोणी ना कोणी वापरत आहे. ते मनीष सिसोदिया यांचे फोन नाहीत. ईडी आणि सीबीआयने न्यायालयाची दिशाभूल करून न्यायालयात खोटे पुरावे सादर केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भ्रष्टाचाराशी काहीही संबंध नाही. कारण खुद्द पंतप्रधानच पूर्णपणे भ्रष्टाचारात बुडाले आहेत. अरविंद केजरीवाल भ्रष्टाचारी असेल तर देशात आणि जगात कोणीही प्रामाणिक नाही, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले. मी पुन्हा म्हणेन की केजरीवाल भ्रष्ट असेल तर या देशात प्रामाणिक कोणी नाही. सीबीआयने उद्या मला बोलावले आहे. मी नक्की जाईन, असं केजरीवाल म्हणाले.

मद्यविक्री धोरणाच्या तपासात केंद्रीय यंत्रणा आमच्याविरुद्ध न्यायालयात खोटे बोलत आहेत. अटक केलेल्या लोकांवर अत्याचार केले जात आहेत. त्यांच्यावर आमच्यावर कारवाई होण्यासाठी दबाव टाकला जात आहे. सीबीआयने नवीन मद्य धोरण प्रकरणात मनीष सिसोदिया यांच्यावर खोटे आरोप केले आहेत, असंही केजरीवाल म्हणाले.


हेही वाचा : दिल्लीच्या मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीचा मोठी कारवाई; देशभरात 40 ठिकाणी छापेमारी


 

First Published on: April 15, 2023 3:44 PM
Exit mobile version