प्रत्येक कुटुंबाला ३०० युनिट मोफत वीज; जुनी बिल माफ, कोणतीही वीज कपात नाही; उत्तराखंडमध्ये केजरीवालांचे वचन

प्रत्येक कुटुंबाला ३०० युनिट मोफत वीज; जुनी बिल माफ, कोणतीही वीज कपात नाही; उत्तराखंडमध्ये केजरीवालांचे वचन

दिल्लीचे मुख्यमंत्री - अरविंद केजरीवाल

पुढच्या वर्षी उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उत्तराखंड निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. तत्पूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज उत्तराखंडला पोहोचले असून आगामी उत्तराखंड निवडणुका पाहता केजरीवाल यांनी तेथील जनतेला संबोधित केले. यावेळी विजेच्या प्रश्नावर त्यांनी जनतेला अनेक वचनं दिली. देहरादून येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सत्ताधारी पक्ष भाजपा आणि विरोधी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांना लक्ष्य केले. केजरीवाल म्हणाले, उत्तराखंडला देवाने सर्व काही दिले आहे. परंतु उत्तराखंडमधील नेत्यांनी आणि राजकीय पक्षांनी त्याचा नाश करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही.

यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले, “७० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधारी राजकीय पक्ष स्वतःच असे म्हणताय की, आमचा मुख्यमंत्री काही कामाचा नाही. यावर विरोधकांचे असे म्हणणे आहे की, उत्तराखंडमध्ये सत्ताधारी पक्षाने मुख्यमंत्र्यांना काही कामाचे नसल्याचे म्हटले आहे. या दोनही पक्षांपैकी कोणालाही उत्तराखंडमधील जनतेची काळजी नाही. उत्तराखंडमधील लोकांबद्दल कोण विचार करणार आणि इथल्या विकास कसा होणार आणि कोण करणार? दोन्ही पक्षांना जनतेची कोणतीही काळजी नाही. दोन्ही पक्ष केवळ आपल्या सत्तेसाठी लढत आहेत. ”

विजेच्या प्रश्नावर बोलताना केजरीवाल म्हणाले, उत्तराखंड स्वतः वीजेची निर्मिती करतो. उत्तराखंडहून इतर राज्यात वीज दिली जाते. तरीही उत्तराखंडमधील रहिवाशांना इतक्या महाग दरात वीज कशी मिळते? उत्तराखंडमधील कोणत्याही सरकारने कधी इथल्या जनतेला मोफत किंवा स्वस्त वीज देण्याचा विचार केला आहे का? तर नाही कारण त्यांच्याकडे जनतेसाठी वेळ नाही ते फक्त सत्तेच्या लढाईत गुंतलेला आहे. केजरीवाल पुढे असेही म्हणाले, उत्तराखंडमध्ये दिल्लीप्रमाणे आपले सरकार सत्तेत आले तर प्रत्येक कुटुंबाला ३०० युनिट्स पर्यंत वीज मोफत देण्यात येईल. जुनी बिले माफ केली जातील. तेथे वीज कपात होणार नसून 24 तास वीज पूरवठा करण्यात येईल. उत्तराखंडमधील शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यात येईल.

 

First Published on: July 11, 2021 5:43 PM
Exit mobile version