राहुल गांधींचं अमेठीत जिंकणं कठीण?

राहुल गांधींचं अमेठीत जिंकणं कठीण?

काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी

गेल्या तीन लोकसभा निवडणुकींमध्ये अमेठी मतदारसंघातून जिंकून येणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे. देशभरात रविवारी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान पार पडले. यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला फक्त १ ते २ जागांवर यश मिळू शकते. उत्तर प्रदेशच्या रायबरेली या मतदारसंघात राहुल गांधी यांच्या आई सोनिया गांधी निवडणूक लढवत आहेत. रायबरेली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यामुळे या ठिकाणी काँग्रेसला सहज यश मिळणार आहे. मात्र, अमेठी मतदारसंघातून जिंकून येणे राहुल गांधींसाठी अवघड होऊन बसले आहे.

२०१४ ची लढत चुरशीची होती

राहुल गांधी यांनी २००४ मध्ये राजकारणात प्रवेश केला होता. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अमेठी या मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवला. याशिवाय सर्वात कमी वयातील ते देशातील पहिले खासदार होते. २००४ नंतर २००९ मध्ये देखील त्यांनी सत्ता राखली होती. २०१४ मध्ये त्यांची लढत भाजपच्या नेत्या स्मृती ईराणी यांच्या सोबत झाली होती. ही लढत अत्यंत चुरशीची ठरली होती. मात्र, या लढतीत राहुल गांधी यांनी बाजी मारली होती.

वायनाड मतदारसंघ राहुल गांधींना तारेल

एक्झिट पोलकडून आलेल्या आकडेवाडीनुसार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशच्या अमेठीत जिंकणं कठीण आहे. या निवडणुकीत देखील त्यांच्या विरोधात भाजपच्या स्मृती ईराणी उमेदवारी लढत आहेत. त्यामुळे लढत अत्यंत चुरशीची आहे. दरम्यान, राहुल गांधी यावेळी केरळच्या वायनाड मतदारसंघातून देखील निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात मुस्लिम समूदाय मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याचा फायदा काँग्रेसला चांगला बसू शकतो. त्यामुळे राहुल गांधी यांची अमेठीतून सत्ता गेली तरी वायनाड येथून त्यांच्या जिंकण्याच्य आशा धगधगत्या राहणार हे मात्र निश्चितच!

First Published on: May 21, 2019 9:25 AM
Exit mobile version