लॉकडाऊनमध्ये नोकरी गेलेल्यांना दिलासा; या सरकारी योजनेअंतर्गत मिळणार भत्ता

लॉकडाऊनमध्ये नोकरी गेलेल्यांना दिलासा; या सरकारी योजनेअंतर्गत मिळणार भत्ता

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांना कमी पगार देण्यात आले. अशा लोकांना सरकारी योजनेची मदत होऊ शकते. कर्मचारी राज्य विमा महामंडळाने अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजना (ABVKY) ही योजना सुरू केली आहे.

अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजनेंतर्गत कोरोना संकटामुळे जर नोकरी गेली असेल तर त्याला बेरोजगारी भत्ता देण्यात येईल. अशा लोकांना त्यांच्या पगाराची तीन टक्के रक्कम तीन महिन्यांसाठी दिली जाईल. ज्यांची नोकरी यावर्षी २४ मार्च ते ३१ डिसेंबर दरम्यान राहिली आहे त्यांना ही मदत मिळणार आहे. विशेष म्हणजे कर्मचारी राज्य विमा महामंडळाने अलीकडेच या योजनेंतर्गत बेरोजगारी भत्ता वाढविला आहे. पूर्वी हा पगार २५ टक्के होता, तो आता ५० टक्के करण्यात आला आहे. याचा फायदा औद्योगिक क्षेत्रात कार्यरत सुमारे ४० लाख कर्मचाऱ्यांना होईल. तसंच मंडळाने या योजनेच्या पात्रतेच्या निकषात दिलासा दिला आहे.

 

First Published on: September 23, 2020 9:09 PM
Exit mobile version