Atiq-Ashraf Murder : हत्येमध्ये तीन नव्हे, पाच जणांचा सहभाग! अन्य दोघांनी केली मदत

Atiq-Ashraf Murder : हत्येमध्ये तीन नव्हे, पाच जणांचा सहभाग! अन्य दोघांनी केली मदत

नवी दिल्ली : अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येचा तपास जसजसा पुढे जात आहे तसे नवीन खुलासे समोर येत आहेत. या दोन्ही भावांचा मृत्यूमध्ये तीन नाही तर पाच जणांचा समावेश होता असे आता समोर येत आहे. गोळीबार करणाऱ्या तरुणांना आदेश देण्यासाठी घटनास्थळी आणखी दोन जण उपस्थित होते.

अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अक्षरफ यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी कोल्विन रुग्णालयात नेले होते. त्यावेळी मिडिया प्रतिनिधींशी बोलताना पत्रकारांच्या वेषात आलेल्या तरुणांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि त्यांची हत्या झाली. या घटनेनंतर तीनहून अधिक जणांचा सहभाग असल्याची भीती सुरुवातीपासूनच वर्तवली जात होती. कारण नेमबाज अचूक वेळेत घटनास्थळी पोहचले कसे? त्यांच्याकडून मोबाईल किंवा पैसे का मिळाले नाही? तिघेही वेगवेगळ्या जिल्ह्यांतील होते? त्यांचा प्रयागराजशी जुना संबंध नव्हता? असे प्रश्न उपस्थित राहिले होते. एसआयटीने कोठडी रिमांडवर मिळाल्यानंतर तिन्ही हल्लेखोरांशी यासंदर्भात प्रश्न विचारल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

या प्रश्नांची उत्तरे शोधताना असताना दोन मदतनीस घटनास्थळी उपस्थित असल्याचे आता समोर आले. मात्र, हे लोक कोल्विन रुग्णालाच्या आत न जाता हल्लेखोरांना जागा दाखवून बाहेरच थांबले होते. या दोघांपैकी एक शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्याची ओळख असलेला स्थानिक होता. त्याने हल्लेखोरांची राहण्याची, जेवणाची आणि इतर व्यवस्था केली होती. सध्या या दोघांबाबत माहिती मिळवण्याचे काम पोलीस करत आहेत.

फोनवर बोलून आदेश द्यायचा
हल्लेखोरांच्या तपासात असे समोर आले की, ते तिन्ही जण दोन हस्तकांच्या संपर्कात होते. हे दोन्ही हस्तक कोणाच्या सांगण्यावरून हल्लेखोरांना मदत करायेच हे अ्दयाप समजले नसले तरी ते कोणाशी तरी फोनवर बोलायचे आणि त्यानुसार आदेश द्यायेच अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे हे हस्तक पकडल्यानंतरच ते कोणाच्या सांगण्यावरून काम करत होते ही माहिती समोर येईल.

अतिक-अशरफची कोठडी मंजूर झाल्यानंतर हल्लेखोर शहरात आले
अतिक-अश्रफची कोठडी मंजूर झाल्यानंतर ते हल्लेखोर प्रयागराजला पोहोचले होते. यानंतर त्यांनी धुमनगंज पोलीस स्टेशनची रेकी केली. त्यानंतर धुमणगंज पोलीस अतिक-अश्रफसह रात्री कौशांबीच्या महागावकडे गेले असता हल्लेखोरांनी तेथेही जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस अचानक परतल्याने त्यांचे नियोजन फसले. यानंतर पोलीस दोघांसह कोल्विनला वैद्यकीय तपासणीसाठी पोहोचले तेव्हाही अपयश आले आणि अखेर 15 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता अतिक अहमद आणि त्यांच्या भावाची हत्या करण्यात हल्लेखोरांना यश आले.

हल्लेखोरांचे पोलीस लाईनमध्येच मेडिकल
पोलीस बंदोबस्तात अतिक आणि अशरफ यांच्या हत्येनंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. हल्लेखोरांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. हल्लोखोरांना मेडिकलसाठी बाहेर घेऊन न जाता पोलीस लाईनमध्येच डॉक्टरांचे पथक बोलावून त्यांचा तपास केला जात आहे.

First Published on: April 22, 2023 6:25 PM
Exit mobile version